मुरबाड विधानसभा मतदार संघात 518 मतदान केंद्र 5 लाखापर्यंत मतदार संख्या जाणार आदर्श आचारसंहितेची करडी नजर..!
नामदेव
शेलार / मुरबाड : 139 मुरबाड विधानसभा मतदारसंघात 518 मतदान केंद्र असून
कल्याण ग्रामीण 61 मुरबाड ग्रामीण 205 बदलापूर शहर 199 अंबरनाथ ग्रामीण 53
असे पुलिंग संख्या आहे.आदर्श आचारसंहिता राबवून कारवाईसाठी आठ पथके स्थापन
करण्यात आले आहेत. पुणे रायगड गोवेली शहापूर चारीही बाजूने नाकाबंदी
करण्यात आली आहे खाजगी सरकारी सार्वजनिक ठिकाणी लावलेले पोस्टर बॅनर
काढण्यात आले असून आचारसंहितेचा भंग करणाऱ्या वर कठोर कारवाई करण्यात येईल
अशी माहिती मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंजली
कानडे पवार सहाय्यक निवडणूक अधिकारी अभिजीत देशमुख यांनी दिली आहे.
मुरबाड
विधानसभा मतदारसंघात एकूण 4 लाख 59 हजार 227 मतदार संख्या असून त्यापैकी
पुरुष दोन लाख 37 हजार 598 तर महिला मतदार संख्या 2 लाख 21 हजार 612 आणि
अन्य 17 असे मतदारांची वर्गवारी असून निवडणुकीच्या मतदानापूर्वी त्यामध्ये
अधिक वाढ होण्याची शक्यता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कल्याण ग्रामीण 61 मतदान केंद्रात 45 हजार 394 मतदार मुरबाडच्या 205 मतदान
केंद्रात अंतर्गत 1 लाख 58 हजार 209 बदलापूरच्या 199 मतदान केंद्रात 2 लाख
74 हजार 93 तर अंबरनाथ मतदान 53 मतदान केंद्र अंतर्गत 44 हजार 531 अशी 4
लाख 59 हजार 227 एवढी मतदान संख्या आहे.
मागील लोकसभा
2019 आणि 2024 मध्ये मुरबाड विधानसभेत एकूण मतदार 3 लाख 86 हजार 731 मतदार
होते त्यापैकी दोन लाख 21 हजार 62 एवढे मतदान झाले होते त्याची टक्केवारी
58% होती लोकसभा 2024 ला 4 लाख 42 हजार 922 मतदार होते त्यापैकी 2 लाख 71
हजार 11 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता त्याची टक्केवारी 61% होती.
2019
च्या विधानसभा निवडणुकीत 3 लाख 97 हजार 69 मतदार होते त्यामध्ये 2 लाख 32
हजार 209 मतदारांनी मतदान केले होते त्याची टक्केवारी 58% होती परंतु
येत्या 2024 च्या विधानसभेला मतदारात 70 हजाराच्या वर वाढ झाल्याने मुरबाड
विधानसभेची समीकरणे बिघडणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीनंतर 30 हजार मतदारात
वाढ झाली असून शेवटच्या तारखेपर्यंत अधिक वाढ होण्याची शक्यता टपाली
मतदारांची संख्या 4000 पर्यंत जाणार आहे.
निवडणूक
निर्णय अधिकारी अंजली कानडे पवार सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अभिजीत
देशमुख यांनी निवडणूक यंत्रणा सज्ज ठेवली असून प्रचाराकडे लक्ष वेधले आहे
शांततेने निवडणुका पार पाडण्यासाठी उपाययोजना आखून पेड मॅटर जाहिराती सोशल
मीडियाकडे लक्ष वेधले आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याची
तारीख 22 ऑक्टोंबर पासून 29 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असून नामनिर्देशन छाननी
30 ऑक्टोबरला होणार आहे उमेदवारी मागे घेण्याची तारीख 4 नोव्हेंबर 2024
पर्यंत असून 20 नोव्हेंबरला मतदान 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल दिला
जाणार आहे.
मतदारांनी बहुमूल्य मत नोंदवायलाच हवे असे अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केले आहे.
मुरबाड
विधानसभा मतदारसंघात बदलापूर शहर अंबरनाथ ग्रामीण कल्याण ग्रामीण आणि
मुरबाड तालुक्याचा समावेश येतो मात्र मुरबाड तालुक्यापेक्षा बदलापूर मधील
मतदारांची संख्या जास्त आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघात यावेळी अटीतटीची
लढाई पाहण्यास मिळणार आहे.
मागील विधानसभेत एकत्र
असणारे यावेळी आमने-सामने उमेदवार म्हणून येणार आहेत तसेच भाजपामधील आमदार
आणि खासदार यांच्यामधील गटबाजी लोकसभेला अपक्षाला झालेला मतदान खासदारकी
निवडणुकीत शरदचंद्र पवार गटाच्या खासदाराला मिळालेले विजय त्यामध्ये
असलेल्या अदृश्य शक्ती सामाजिकता विकास गटबाजी अशी सूत्र असलेली मुरबाड
विधानसभेची रंगीत तालीम सुरू झाली आहे.
मुरबाड
विधानसभेत यावेळी तिरंगी लढत होणार नाही मात्र सत्ताधार्यांमध्येच लढत
होण्याचा संभव आहे मतदानाची टक्केवारी लोकसभेपेक्षा वाढण्याची अपेक्षा असून
मतदार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत.
मुरबाड
विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना भाजपामधील गटबाजी
थांबवण्यास अपयश आल्याचे समोर येत आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे
आमदार किसन कथोरे यांनी तीन वेळा विजय मिळवला असून चौथ्यांदा पुन्हा
निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर त्यांच्या विरोधात कोणत्या पक्षाचा
उमेदवार रिंगणात उतरणार याकडे सर्व मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे ही
निवडणूक अटीतटीची होण्यासाठी भारदस्त उमेदवाराची आवश्यकता आहे असे
जाणकारांचे मत आहे.
No comments