ॲड.संजय सावंत पाटील यांची भाजपा विधानसभा निवडणूक संचालन समिती मध्ये कोकण विभाग संपर्क प्रमुख पदी निवड
पुणे : भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश ‘विधानसभा निवडणूक
२०२४ संचालन समिती’ मध्ये ॲड. संजय सावंत पाटील यांची कोकण विभाग कायदेशीर
बाबी आणि निवडणूक आयोग संचालन समिती 2024 मध्ये कोकण विभाग संपर्क प्रमुख
पदी जबाबदारी देऊन काम करण्याची संधी उपलब्ध दिलेली आहे.
विधानसभा
निवडणूक 2024 च्या अनुषंगाने ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे पाटील यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेल्या
भारतीय जनता पार्टी विधानसभा निवडणूक 2024 संचालन समिती मध्ये विश्वास
पाठक यांच्या अध्यक्षतेखाली कायदेशीर बाबी आणि निवडणूक आयोग समितीमध्ये
ॲड. संजय सावंत पाटील यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती झाली आहे.
सध्या
ॲड. संजय सावंत पाटील हे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य कायदा आघाडी
मध्ये प्रदेश उपाध्यक्ष पदी आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्यवर
प्रदेश निमंञित सदस्य म्हणून ह्या प्रमुख पदावर गेल्या 1 वर्षापासून
कार्यरत आहे. तसेच पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक मर्यादित वरती
कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.यापूर्वी भारतीय जनता पार्टी पुणे
जिल्हा कायदा आघाडी मध्ये जिल्हाध्यक्ष पदी तसेच स्वच्छ भारत अभियान,
महाराष्ट्र राज्य मध्ये प्रदेश सरचिटणीस ह्या पदावर 3 वर्षे कार्यरत होते.पक्षाच्या
ध्येय धोरणानुसार होत असलेल्या पक्षाच्या संघटनात्मक कार्यात काम करण्याची
संधी उपलब्ध करून दिली म्हणून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे व सर्व सन्माननीय
पक्षश्रेष्ठींचे आभार ॲड. संजय सावंत पाटील यांनी मानले आहे.
No comments