web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड कल्याण एसटी बस सेवा खोळंबली विध्यार्थी, महिला, जेष्ठ नागरिक यांचे हाल..!


नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड कल्याण जादा बसेस सोडल्या जातील असे नेहमी आश्वासने दिली जातात मात्र मुरबाड बस आगारातून कल्याण कडे जाणारे एसटी बसेस नसल्याने कल्याण कडून मुरबाडला येण्यासाठी कल्याण आगारातून बसेस न सोडल्याने महिला ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थी यांचे हाल झाले आहेत.

मुरबाड एसटी डेपो मधून गाड्या आल्या नसल्याने कल्याण डेपो मधून बसेस सोडल्या जाणार नाही असे कल्याण डेपो मधून सांगितल्याने मुरबाडचे प्रवाशी यांनी संताप व्यक्त केला आहे.

कल्याण डेपो नेहमी मुरबाडकरांचे हाल करत असून मनमानी पद्धतीचा कारभार येथे सुरू असल्याचे प्रवाशी यांनी बोलताना सांगितले आहे.

No comments