Big Breaking News : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या, SRA च्या वादातून गोळीबार?
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईच्या वांद्र्यातील खेरवाडी परिसरार हत्या करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी रात्री 9 वाजेच्या सुमारास गोळीबार केला. त्यांच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी त्यांच्या छातीवर लागली.
वृत्तसंस्था ANI च्या माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांना तातडीने उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुनर्विकास प्रकल्पाच्या वादातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दोन आरोपींनी पोलिसांनी अटक केल्याचं पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.
#UPDATE | Senior NCP leader Baba Siddique passes away: Lilavati Hospital https://t.co/P0VWePWldd
— ANI (@ANI) October 12, 2024
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या ठिकाणी गोळीबार झाला, तिथे फटाके वाजत होते. फटाक्यांच्या आवाजामुळे बाबा सिद्दीकी यांना गोळी लागल्याचं इतरांना कळालंच नाही. घटनेची माहिती मिळताच बाबा सिद्दिकी यांना तातडीने लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहचेपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. गोळी शरीरातच अडकली होती. त्यामुळे रुग्णालयाचा नेण्यापूर्वीच त्यांचा मृ्त्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
15 दिवसांपूर्वीच मिळाली होती जीवे मारण्याची धमकी
बाबा सिद्दिकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. मात्र तरी देखील बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे पोलिसांचा वचक राहिला की नाही असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.
No comments