web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मधील कोलठण गावा जवळील फटाक्याच्या गोडाऊन मध्ये भीषण स्फोट १ जन ठार

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील शिंदिपाडा कोलठण गावाच्या परिसरात असणाऱ्या फटाक्यांच्या गोडाऊन मध्ये येथील कामगार फटाक्यांची इकडून तिकडे उचलठेव करीत असतांना अचानक भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, कोणाला कळण्याच्या आताच धुराचे लोळ उठले आणि मोठा आवाज झाला. या स्फोटात गोडाऊन मालकाच्या मुलगा मनीष याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे कळते . तर अन्य एक २ जण  जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त होत आहे. 

     दिवाळी जवळ आली की वाडा, उल्हासनगर व इतर ठिकाणा हून फटाके होलसेल भावात विक्री करण्या साठी मुरबाड तालुक्यातील अनेक ठिकाणच्या गोडाऊन मध्ये साठा करून ठेवला जातो,असाच साठा करून ठेवलेल्या फटाक्याच्या गोडाऊन मध्ये अचानक स्फोट झाल्याने गोडाऊन मालकाच्या मुलासह अन्य २ जन जखमी झाल्याची घटना मुरबाड मध्ये घडली आहे. या प्रकरणी या ज्वलनशील फटाक्यांच्या अशा प्रकारे साठ्याच्या परवानगीचा मुद्दा समोर आला आहे.या भीषण स्फोटाची माहिती मिळताच मुरबाड पोलीस व तहसीलदार यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. एकंदरीत ज्वालाग्राही वस्तूंचा साठा करण्या साठी रीतसर परवानगी घेतली जाते का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

No comments