76 वर्षात मुरबाडला लाभलेला पोलीस अधिकारी प्रसाद पांढरे (Prasad Pandhare) यांची ठाणे जिल्ह्यात पुन्हा मागणी;मुरबाडकर जगतात भयभीत वातावरणात..!
नामदेव शेलार / मुरबाड : गेल्या 76 वर्षात अधिक उंचावर
गेलेली मुरबाडची गुन्हेगारीचा चोऱ्या,दरोडे,हाणामाऱ्यांचा भिमोड करून
प्रत्येक नागरिक महिलांची सुरक्षा सांभाळणाऱ्या राष्ट्रपतीपदक धारक पोलीस
अधिकारी मुरबाड मधून जाताच मुरबाडच्या असुरक्षितेचा प्रवास सुरू झाला आहे. सुरक्षितेचा
अचूक नियोजन हप्तेबाज पोलिसांना लगाम प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून
घेऊन कायदेशीर कारवाई करून मार्गदर्शन वक्ता बनलेल्या पोलीस अधिकारी मुरबाड
मधून बदली होऊन जातात मुरबाड मध्ये गुन्ह्यात वाढ झाली आहे. त्यांना पुन्हा
ठाणे जिल्ह्यात बढती देऊन सामान्य ग्रामीण जनतेला न्याय शासनाने द्यावा
अशी मागणी होत आहे.
पोलीस अधिकारी प्रसाद पांढरे
(Prasad Pandhare) यांचे प्रत्येक नागरिकांशी जिव्हाळ्याचे नाते जुळले होते लोकसभा निवडणुकीत
पंतप्रधानांच्या सभेची जबाबदारी भिवंडीला यशस्वी पार पाडली होती मुरबाड
मधील चोऱ्या दरोडे खून हाणामाऱ्या प्रकारांना लगाम घातला होता मोर्चे
आंदोलनात स्वतः पुढे येऊन सामाजिकतेतून मार्ग काढणारा पोलीस अधिकारी मुरबाड
करांना 76 वर्षात पहिल्यांदाच मिळाला होता अवैद्य धंद्यांना लगाम घालून
मुरबाड शहरात सर्वत्र सीसीटीव्हीचे जाळे त्यांच्यामुळेच निर्माण झाले होते
सर्व जाती-धर्माचे लोकांना एकोब्याची मार्गदर्शन तत्वे जनजागृती करून
बेरोजगार तरुणांना शिक्षण रोजगारासाठी उच्च स्तरावर मार्गदर्शन करून लाभ
मिळवण्यासाठी प्रयत्न करत राजकारण समाजकारण लोकशाहीत सर्वांनी करावा मात्र
माणसांमधील अंतर कमी होणार नाही याची खबरदारी घेऊन सांगणारे प्रसाद पांढरे
हे कोणावरही खोटे गुन्हे दाखल करत नव्हते पत्रकार मीडियाला जवळ घेऊन असणारी
माहिती देत होते पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांचे काम स्वतः मार्गी लावत होते
परंतु त्यांची बदली होताच मुरबाड पुन्हा असुरक्षितेचा किल्ला बनला आहे.
गुन्हा
कुठे घडला काय घडला याची माहिती मीडियाला जिल्हा माहिती कार्यालय किंवा
फिर्यादी कडून जाणून घ्यावी लागते त्याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत
होण्याचा संभव आहे. मुरबाडला अधिकारी लोकप्रतिनिधींचा किती सन्मान ठेवतात
त्याचा परिणाम आणि लाभ पोलिसांनाच होत असल्याची भावना येथील नागरिकांमध्ये
निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. मुरबाड तालुक्यात पोलीस अधिकारी प्रसाद
पांढरे बदली होऊन घडलेल्या घटना गेल्या चार वर्षात घडल्या नाहीत याची खमंग
चर्चा आहे. मुरबाडची जनता भोळी गरीब मायाळू आहे
परंतु त्यांना अपेक्षित असे नेतृत्व हवे आहे अधिकाऱ्यांच्या दबंगशाहीला
महत्त्व देत नाहीत येत्या विधानसभा निवडणुकीत अनेक समस्या निर्माण होणार
नाही यासाठी पोलीस अधिकारी प्रसाद पांढरे (Prasad Pandhare) यांच्यासारखे अधिकारी पोलीस
उपविभागीय अधिकारी जिल्हा पोलीस कार्यालयात हवे आहेत. वाढणारे गुन्हे
कोणत्या चुकांमुळे घडतात कर्तव्यास कसूर कुठे होतो समान न्याय निवाडा
मीडियापासून दूर राहते कायदा सुव्यवस्थावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत.
मुरबाड
कोलठाण येथे फटाक्याच्या गोडाऊनमध्ये स्फोट होऊन त्यामध्ये मालकाचा मुलगा
ठार झाला दोन जण जखमी झाले असे तालुक्यात स्फोटक वस्तू ठेवणारे आणखी गोडाऊन
असल्याचे वृत्त आहे त्यांना परवानग्या असतील मात्र त्यांची सुरक्षाची
पहाणी कोण करते याकडे दुर्लक्ष होत आहे. मुरबाड
पोलीस उपविभागीय डीवायएसपी यांच्या कार्यालया अंतर्गत टिटवाळा पोलीस
ठाण्यात मुरबाड पोलीस ठाण्यात गेल्या महिन्याभरात घडलेल्या गंभीर घटनांचा
वरिष्ठांना गांभीर्य असणार परंतु हा तालुका मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्याचा
आहे सत्ताधारी गृहमंत्र्यांच्या विभागाचा आहे अशा ठिकाणी कर्तव्य जबाबदार
गुन्हेगार अवैद्य धंद्यांचा कर्दनकाळ योग्य गुन्हेगारावर कारवाई करणारे
प्रसाद पांढरे यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आहे लोकसभा
निवडणुका यशस्वी पार पाडल्या आता विधानसभेत त्यांची गरज आहे जनसामान्यांना
बिनधास्त मोकळ्या वातावरणात सुरक्षित राहण्यासाठी जबाबदारी सरकारने घ्यावी
अशी मागणी होत आहे.
No comments