web-banner-lshep2024

Breaking News

Maharashtra Election 2024 : विधानसभेचं बिगुल वाजलं! तुमच्या मतदारसंघात मतदान आणि मतमोजणी कधी? वाचा वेळापत्रक

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. तर राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली असल्याची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे.

निवडणुकीचं वेळापत्रक

महाराष्ट्रात 20 नोेव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. 

  • अर्ज भरण्याची मुदत - 29 ऑक्टोबर 2024
  • अर्जाची छाननी -  30 ऑक्टोबर 2024
  • अर्ज माघारीची मुदत- 4 नोव्हेंबर 2024
  • मतदान - 20 नोव्हेंबर 2024
  • मतमोजणी- 23 नोव्हेंबर 2024

राज्यातील मतदारसंघ आणि मतदारांची माहिती

महाराष्ट्रातील एकूण मतदारसंघ 288 असून त्यातील सर्वसाधारण मतदारसंघांची संख्या इतकी आहे. 25 मतदारसंघ अनुसूचित जमातींसाठी तर 29 मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे.  महाराष्ट्रात एकूण 9.59 कोटी मतदार आहेत. यामध्ये 4.95 कोटी पुरुष मतदार आहेत तर 4.46 कोटी महिला मतदार आहेत. तृतीयपंथी मतदारांची संख्या 5997 इतकी आहे तर दिव्यांग मतदारांची संख्या 6.32 लाख इतकी आहे. 

85 वर्षांवरील मतदारांची संख्या 12.48 लाख इतकी आहे तर 100 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 49034 इतकी आहे. 18-19 वर्षांच्या आणि पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांची संख्या 19.48 लाख इतकी आहे.

राज्यातील मतदान केंद्रे कशी असतील?

मतदान केंद्रांबाबत सांगायचे झाल्यास 1 लाख 186 मतदान केंद्र मतमोजणीसाठी उपलब्ध करून देण्यात येतील. यातील 42585 शहरी भागात, 57601 मतदान केंद्र ग्रामीण भागात असतील. एका मतदान केंद्रावर सरासरी 950 मतदान मतदानाचा हक्क बजावतील असा अंदाज आहे. महाराष्ट्रात 530 आदर्श मतदानकेंद्र असतील. मतदान केंद्रांमध्ये दिव्यांगांच्या सहाय्यतेसाठी मदतनीस असतील, मदत कक्ष असेल. दिव्यांगांना मतदान केंद्रात जाणे सुलभ व्हावे यासाठी रँप असतील. याशिवाय शौचालये, पिण्याचे पाणी, दिशादर्शक, वीजेची सुविधा याचीही सुविधा असेल. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदानाचे केंद्र हे तळमजल्यावर असेल आणि त्यांना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल. 12D फॉर्म भरल्यानंतर घरी येऊन वयोवृद्ध नागरिकांचे मत नोंदवून घेतले जाईल. वोटर हेल्पलाईन अॅपमध्ये मतदार आपले नाव तपासू शकतील, मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती जाणून घेऊ शकतील आणि e-EPIC डाऊनलोड करू शकतील. सी-व्हिजील अॅपद्वारे कोणत्याही गैरप्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येऊ शकेल. यात तक्रारदाराचे नाव गुप्त राखले जाईल. KYC APP मध्ये उमेदवारांविरोधात दाखल गुन्ह्यांचा सगळा तपशील उपलब्ध होऊ शकेल.  महाराष्ट्रातील 20 सीमावर्ती जिल्हे आहेत. 6 राज्यांच्या सीमा या महाराष्ट्राशी संलग्न आहेत. यात कर्नाटक, गोवा, तेलंगाणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश गुजरात आणि दादरा नगर हवेली यांच्या सीमा संलग्न आहेत.

No comments