मुरबाड विधानसभेत पवार कथोरे आमने-सामने दोघेही राष्ट्रवादी तालमीचे..!
नामदेव शेलार/ मुरबाड : येत्या विधानसभा निवडणुकीत सत्तेत
असलेले एकेकाळचे शरद पवारांचे समर्थक आमदार किसन कथोरे माजी आमदार गोटीराम
पवार आमने-सामने आले आहेत काँग्रेस पासून राजकारणात आलेले शरद पवार यांचे
दोन्हीही शिष्य गेल्या पाच वर्षांपूर्वी भाजपा आणि शिवसेनेत गेले होते
आमदार किसन कथोरे भाजपाच्या तिकिटावर लढले त्यांच्या विरोधात गोटीराम पवार
अपक्ष लढले होते.
मागील निवडणुकीत आमदार किसन कथोरे
(भाजपा) यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदूराव यांनी निवडणूक
लढविली त्यावेळी माजी आमदार गोटीराम पवार यांचा पुत्र सुभाष पवार यांनी
शिवसेनेत प्रवेश करून भाजपाचे किसन कथोरे यांना मदत केली होती .त्यानंतर
सुभाष पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले होते.मात्र मुरबाड
विधानसभेत एकास एक असणारे विधानसभेचे प्रतिस्पर्धी आमदार किसन कथोरे
शिवसेनेचे सुभाष पवार राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव सत्तेत एकत्र आल्याने
मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदार किसन कथोरे यांच्यासमोर जिंकणारा
प्रतिस्पर्धी नव्हता मात्र गेल्या सहा महिन्यापासून माजी आमदार गोटीराम
पवार यांचे पुत्र सुभाष पवार यांनी शिंदे शिवसेना गटातून आमदारकीचे रणशिंग
फुंकले होते .परंतु त्यांना सत्तेत एकत्र लढण्याचा पक्षातून उमेदवारी मिळणार
नसल्याचे ध्यानात आल्याने सुभाष पवार पुन्हा शरदचंद्र पवार यांच्या
पक्षाकडे जातील असा सूर उगवला होता तिकीट वाटपावेळी दोघांपैकी कोण शरद पवार
यांच्या राष्ट्रवादीत जाणार याची मतदारांना चर्चा होती मात्र आमदार किसन
कथोरे यांनी भाजपा सोडली नाही.
लोकसभेत भाजपाचे
किसन कथोरे आमदार आणि भाजपाचे माजी खासदार तथा राज्यमंत्री कपिल पाटील
यांच्यात गटबाजी होऊन कपिल पाटील यांचा पराभव झाला त्या खासदारकीत शरदचंद्र
पवार पक्षाचे सुरेश (बाल्यामामा) म्हात्रे निवडून आले लोकसभेत सुभाष पवार
यांनी शरद पवार यांचे उमेदवार बाल्यामामा म्हात्रे यांच्या विरोधात काम
केले होते. परंतु विधानसभेला सुभाष पवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत
जाऊन भाजपाचे किसन कथोरे यांच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचे वृत्त
आहे. सुभाष पवार शरद पवार यांच्या पक्षात गेल्यास पुन्हा कथोरे पवार
दोन्हीही भारदस्त नेते आमने-सामने येणार आहेत तर दोन्हीही आजी माजी खासदार
बाल्यामामा म्हात्रे आणि कपिल पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
No comments