महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रेटिना स्पेशलिस्ट डॉक्टर प्रसाद कामत मुरबाड मध्ये..!
मुरबाड : मुरबाड तालुक्यातील डोळ्यांच्या समस्या असणाऱ्या नागरिकांसाठी मुरबाड शहरामध्ये कार्यरत असणाऱ्या इन्फिगो आयकेयर हॉस्पिटल मुरबाड मध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रेटिना तज्ञ डॉ प्रसाद कामत गुरुवार दि. १० ऑक्टोंबर २०२४ रोजी ठिक सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मुरबाड उपलब्ध राहतील
सदर शिबिरात मधुमेहग्रस्त नागरिक तसेच ज्या नागरिकांची नजर अचानक कमी झाली आहे चष्म्याचा नंबर वाढत असेल किंवा डोळ्यांपुढे काळे ठिपके दिसत असल्यास डोळ्यांच्या पडद्याची समस्या असणाऱ्या नागरिकांनी सदर शिबिरात सहभागी होऊन डॉक्टर प्रसाद कामत यांच्याकडून परिपूर्ण नेत्र तपासणी करून घ्यावी. या शिबिरात डॉ प्रसाद कामत नागरिकांना डोळ्यांच्या समस्या बद्दल योग्य ते मार्गदर्शन करून उपचार सुद्धा करणार आहेत
तरी नागरिकांनी सदर शिबिरात नाव नोंदणी करून मोठ्या संख्येने उपस्थित राहून सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन इन्फिगो आय केअर हॉस्पिटल मुरबाड चे केंद्रप्रमुख झुंजारराव यांनी केला आहे
नाव नोंदणीसाठी संपर्क ९२०९७२७३७६
No comments