web-banner-lshep2024

Breaking News

माळशेज घाट पायथ्याशी आदिवासी वाड्या वस्त्यांमधील समस्या गंभीर आरोग्य पाणी रस्ते शेती रोजगार शिक्षणाचा समावेश...!


नामदेव शेलार / मुरबाड :  मुरबाड तालुक्यामधील वैशाखरे टोकावडा माळशेज घाट माथ्याखाली असलेल्या 50 आदिवासी वाड्या पाडे 50 गावे आदिवासी ट्रॅव्हल एरिया पेसा अंतर्गत 19 गावे आहेत तेथील सार्वजनिक समस्या बिकट बनल्या आहेत. 

     टोकावडा वैशाखरे परिसरातील तळेगाव,खरशेत,शिरोशी,मोरोशी,थिदवी,फागुळगव्हाण, रामपूर,सोनावळे,पळू,सिंगापूर,धानकेवाडी,न्याहाडी,खुटल बंगला,सोनगाव या परिसरात गोरगरीब नागरिक आदिवासींना शासनाच्या योजनेचा लाभ ठराविक लोकांना मिळाल्याने तेथील गोरगरीब नागरिक आदिवासी बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

     एका बाजूला अनिल ठेकेदाराची मक्तेदारी धसई पळू सोनावळ्याकडे सुहास ठेकेदाराची मक्तेदारीने गेल्या दहा वर्षात 100 कोटीच्या वर कामे केली असताना समस्या गंभीर बनल्या आहेत.आदिवासींना झोपड्या नाहीत पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही चांगला दवाखाना नाही वाड्या-पाड्यांना रस्ते नाहीत हाताला काम नसल्याने घाटमाथ्यावर आदिवासी बांधव कामासाठी जातात घरात विद्युत मीटर नसल्याने अंधार असतो मुलांच्या शिक्षणासाठी चांगल्या शाळा कॉलेज येथे सोयी सुविधा नाहीत दरीखोऱ्यांची गावे वाड्या-पाड्या असल्याने एसटी बसेस जात नाहीत अशा अतिदुर्गम भागाची शासकीय कामांची ठेकेदारी ठराविक अनिल-सुहास यांच्या हातात असताना रस्ते पाणी योजना सह विविध योजनांची कामे मार्गी लागलेली नाहीत. 

       गोरगरीब दुर्बल घटकांच्या नावे येणारा विकास निधीवर डल्ला मारणारे ठेकेदार अधिकारी येथील गोरगरीब आदिवासींचा मतांच्या लाचारीसाठी शोषण करत आहेत त्यांच्या सर्व विकास कामांची चौकशी सरकारने करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत याचा फटका भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांना बसला असल्याचे बोलले जात आहे. 

      नुकतेच आचारसंहितापूर्वी मे महिन्यापासून ऑक्टोंबर पर्यंत याच आदिवासी भागात 50 कोटीच्या वर एका सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाचे टेंडर झाले आहेत गेल्या आर्थिक वर्षात त्याच ठिकाणी 50 कोटीच्या वर रस्ते साकव संरक्षण भिंती इमारती दुरुस्ती अशी विविध कामावर शासनाचा निधी खर्च झाला असताना आदिवासी दुर्बल भागाचा विकास कुठे आहे असे स्थानिक विचारत आहेत. 

      ज्या आदिवासी गोरगरिबांचे विद्युत मीटर देतो सांगून आणलेल्या लोकांना पक्षप्रवेशाकडे वळवण्याचा दुप्पटी राजकारणावर जनतेची नाराजी आहे प्रत्येक लोकप्रतिनिधींनी लोकांच्या समस्या प्रामाणिक सोडवल्या परंतु त्यांच्या पुढे पुढे करणारे ठेकेदार अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लोकांची नाराजी निर्माण केल्याने येत्या निवडणुकीत कोणीही पुढे येण्यास तयार होत नाहीत. 

 एका बाजूला ठेकेदारी त्यामधून जिल्हा परिषद पंचायत समिती अन्य निवडणुका जिंकण्याचा मनसूबा रचणारे आता जमवाजमवीसाठी धावपळ करताना दिसत आहेत टेंडर याच लोकांनी भरायचे अधिकाऱ्यांना मॅनेज करून लोकप्रतिनिधींच्या पुढे समाजकार्याचा देखावा करणाऱ्यांनी जनमाणसांचा विश्वासघात केला असल्याचा संताप व्यक्त करून आमच्या जल जीवन पाणी योजना पूर्ण करा असा संतप्त सवाल केला जात आहे. 

      निवडणुका आल्यावर मिळावे शिबिरे साडीवाटप सत्कार यामधून मतदारांना आकर्षित करण्याचा ठेकेदारी डाव तमाम नागरिकांनी ओळखल्याने प्रत्येक खासदारकी आमदारकी निवडणुकीत 30 ते 40 हजार मतदान विरोधाची टक्केवारी बनत आहे मुरबाड सार्वजनिक बांधकाम उपविभाग ठेकेदाराची पोषनावळ अर्धे तुम्ही अर्धे आम्ही असा पतंगीचा खेळ सुरू आहे. 

   शासनाच्या योजनेच्या कामाची माहिती देता येत नाही अशी माहिती आलूबुखार उपअभियंता पतंगीराव यांनी आम्हाला दिली आहे.कुडवलीच्या आयटीआय कॉलेजचा दहा लाखाचा काम तीन लाखात करणाऱ्या मुरबाड सार्वजनिक उपाभियंता शाखा अभियंतांनी दोन वर्षात पन्नास कोटीच्या वर निधीत गैरकारभार केला आहे त्याची चौकशी करावी अन्यथा उपोषण आंदोलन करू असा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.

 

No comments