web-banner-lshep2024

Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीचा पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी घेतला आढावा

ठाणे :  ठाणे शहरात कासारवडवली येथील वालावलकर मैदान येथे होणाऱ्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार, दि.5 ऑक्टोबर 2024 रोजी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान यांच्या या दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज गुरूवार, दि.3 ऑक्टोबर रोजी वालावलकर मैदान, बोरीवडे या प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी घेतला.

    बैठकीच्या सुरुवातीस उपस्थित नोडल अधिकाऱ्यांनी पालकमंत्री महोदयांना नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली.

       मुख्य सभामंडप, पार्किंग व्यवस्था येथील सर्व नियोजन करण्यात यावे. त्याचबरोबर वीज पुरवठा, इंटरनेट सेवा, आरोग्य सेवा यांची पर्यायी व्यवस्थाही उपलब्ध करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा नियोजित दौरा शनिवार, 5 ऑक्टोबर 2024 रोजी होणार आहे. या दौऱ्यासाठी आवश्यक सर्व व्यवस्थांचे नियोजन करण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे. त्यानुसार, पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ठाणे वालावलकर मैदान येथे बैठक संपन्न झाली. 

      या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे रोहन घुगे,अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये- धुळे, सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, अतिरिक्त पोलीस आयुक्त विनायक देशमुख, , पोलीस उपायुक्त वाहतूक पंकज शिरसाठ,  मुख्यमंत्री कार्यालयाचे विकास औटे यांच्यासह विविध विभागांचे /कार्यालयांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.


No comments