येत्या विधानसभा साठी आमदार किसन कथोरे ॲक्शन मोडवर;प्रत्येक गावागावात विकास कामांना गती युवक वृद्ध महिलांना हवा कथोरे हेच पुनर्च्य आमदार...!
नामदेव शेलार / मुरबाड : प्रत्येकाच्या मनामनात घराघरात आमदार किसन कथोरे यांचे कौटुंबिक नातं निर्माण करताना येत्या विधानसभा निवडणुकीची पहिली प्रचार फेरी विकास कामांना गती देऊन पूर्ण केली आहे पक्षाच्या पदाधिकारी नवनियुक्त तीर्थक्षेत्र यात्रा लाडकी बहीण योजना प्रशासनात अडकलेली नागरिकांची कामे याचबरोबर शासनाचा मंजूर निधीच्या कामांचा शुभारंभ करून आमदार किसन कथोरे ॲक्शन मोडवर आले आहेत.
सकाळी मुरबाडला दुपारी कल्याण ग्रामीण संध्याकाळी रात्री बदलापूर अंबरनाथ मध्ये आमदार किसन कथोरे यांचा जनता दरबार हाउसफुल चालला आहे नागरिकांना भेडसावणाऱ्या विज पाणी नादुरुस्त रस्ते यांच्या तक्रारी माझ्याकडे लोकांमार्फत येता कामा नये गणेशोत्सव काळात प्रत्येक गाव शहरांमधील नागरिकांना सुविधा पुरवा असा आदेश संबंधित अधिकाऱ्यांना आमदार किसन कथोरे यांनी दिला आहे.
गेल्या पंधरा वर्षात त्यांनी मतदारसंघांमधील प्रत्येक गावात आपला कौटुंबिक सदस्य म्हणून ओळख तयार केल्याने येत्या विधानसभेला प्रत्येक युवक वृद्ध महिलांना आमदार किसन कथोरे हेच हवेत असा सूर उमटत आहे.
जिल्हा परिषद गट पंचायत समिती गण ग्रामपंचायत शहर प्रभाग बरोबर तालुका पातळीवर मेळावे शिबिरे घेऊन निपक्षपाती आमची माती माझी माणसं असा सामाजिक चळवळ उभी करून प्रत्येक कुटुंबाची विचारपूस करून त्यांच्या सुखदुःखात सहभागी झाल्याने असा आमदार येत्या विधानसभा निवडणुकीत किसन कथोरे शिवाय कोणी नाही हा बदल मुरबाड विधानसभेत सर्व जाती-धर्माच्या लोकात झाला आहे.
महिलांना तीर्थस्थानाचा लाभ दिला त्यांच्यासोबत आमदार किसन कथोरे यांची सौभाग्यवती कमल किसन कथोरे (नानी) स्वतः हजर होती त्यांच्या भावनिक सौंदळा महिलांनी आपुलकीने दाद दिली आहे.
सडेतोड,निपक्ष,निर्भीड,डॅशिंग, भूमिका घेणारे विकासाचा वादळ म्हणून आमदार किसन कथोरे परिचित आहेत असा आमदार आमच्या विधानसभेला दुसरा कोण लाभणार इकडे तिकडे खुर्चीसाठी भटकंती करून स्वतःचा स्वार्थ साधणारे निवडणुकीला आम्हाला प्रलोभने दाखवणारे नकोत अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
गेल्या विधानसभेला आमदार किसन कथोरे यांना 1 लाख 60 हजाराच्या वर मताधिक्य मिळाले होते त्यावेळी त्यांना असणारा राजकीय विरोध येत्या विधानसभेला मावळला असून स्थानिकांचा ओघ त्यांच्याकडे वाढला आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघांमधील गुन्हेगारी संपवली महिला मुलींना सुरक्षित केले गावागावांमधील तंटेमुक्त केले आदिवासी वाड्यापाड्यांना रस्त्याचे जाळे विणले शासनाच्या विविध योजनेचा लाभ लाभार्थींना देऊन सामान्य घरामधील तरुणांना प्रत्येक क्षेत्रात जाण्याची संधी दिली त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून समाजकारण राजकारण अन्य क्षेत्रात नव्या पिढीला उभारणी दिली आमदार किसन कथोरे यांना झुरळाची राजकारणात भीती नाही अशा भावना तरुण कार्यकर्त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केले आहेत.
शेतकऱ्यांना भूसंपादित जमिनीचा मोबदला नोकरी देऊन राष्ट्रीय महामार्गात बाधित होणार मुरबाड शहराचे वैभव शहरातील रहिवासी क्षेत्र सुरक्षित ठेवलं भव्य उड्डाणपूल उभे केले शेतकऱ्यांना शेती अवजारे साहित्य वाटप करून कोणत्याही आदिवासी गोरगरीब सर्व समाजातील माणसावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेऊन सर्वांना विकासासाठी बरोबर घेतल्याने मुरबाड विधानसभेत मुरबाड ची माणसं मुरबाडची माती हीच राज्याच्या जडणघडणीत आमदार किसन कथोरे यांचा पॅटर्न राबवण्यासाठी अनेक जण त्यांच्याकडून अभ्यास करून घेत आहेत.
No comments