web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड तालुक्यातील रेशनिंग धान्य काळाबाजारात विकणाऱ्या दुकानदार टोळीचा शोध घेण्यास महसूल विभागाला अपयश कार्डधारकांचा मोठा घोटाळा बाहेर येणार आनंदाचा शिधा गायब..!

निलेश जोशी / कल्याण : मुरबाड तालुक्यात दुकानदारांचा धान्य खरेदीसाठी दुकानदारांना पैसा पुरवून गहू तांदूळ जीवनास्तूक वस्तू आनंदाचा शिधा वाटपाचा काळाबाजार करत आहेत त्याचा शोध घेण्यास महसूल विभागाला अपयश आले आहे मुरबाड 196 रेशनिंग दुकानदारांकडे असणाऱ्या कार्डधारकांच्या नावे येणाऱ्या गहू तांदूळ साखर जीवनास्तूक वस्तू काळ्याबाजारात घेऊन विक्री करणारे दलालांचे दोन विभाग असल्याचे बोलले जात असून एक गट 60 ते 80 रेशनिंग धान्य दुकानांमधील धान्य मुरबाड सरळगाव म्हसा विभागाचा काळाबाजार मॅनेजमेंट करून विक्री करत असून टोकावडा खापरी वैशाखरे आदिवासी परिसरामधील धान्य दुकानातील रेशनिंग धान्य दुसरा गट काळयाबाजारात विक्री करत असल्याची चर्चा पुरवठा विभाग महसूल विभागासह संबंधित नियंत्रित यंत्रणांना माहिती असताना कारवाई होत नाही या सर्व प्रकाराची चौकशी सीआयडीमार्फत शासनाने करावी अशी मागणी स्वतंत्र संपादक पत्रकार संघाने शासनाकडे केली आहे. 

 राजकीय बळाचा वापर करून रेशनिंग काळाबाजार कित्येक वर्ष सुरू आहे ज्याची सत्ता त्याच्याकडे रेशनिंग दुकानदारांचा कल दिसून येतो कोव्हिड कालावधीत हजारो टन धान्य जीवनास्तुक वस्तूंचा काळाबाजार केल्याची तक्रार पुरवठा मंत्र्यांकडे केली होती त्याची चौकशी अद्याप गुलदस्त्यात आहे कार्डधारकांना वाटप करण्यात येणारा आनंदाचा शिधा दसरा दीपावली गौरी गणपती अन्य सणाला देण्याचा निर्णय सरकारने घेतला परंतु मुरबाडच्या गोडाऊनला आनंदाचा शिधा सण झाल्यावर कधी येतो कधी येत नाही यावर लाभार्थींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 

 येत्या गौरी गणपती सणाला लाभार्थींना अद्यापही आनंदाचा शिधा मिळाला नाही मुरबाड तालुक्यात ऑफलाइन ऑनलाईन कार्डधारकांचा मोठा घोटाळा असून ऑफलाईन धान्य उचलून धान्य काळाबाजार केला जातो तालुक्यातील सर्व कार्डधारकांची नोंदी तपासाव्यात कार्डधारकांना कमी प्रमाणात धान्य वस्तू देऊन तसेच मयत घर गाव सोडून गेलेल्या लाभार्थींचे धान्याचा काळा बाजारात समावेश असल्याचा संशय असून मुरबाड शहरासह तालुक्यातील धान्य काळाबाजाराची सीआयडीमार्फत चौकशी करावी महसूल विभागाने 24 तास  तपास पथक कार्यालयात नियंत्रित ठेवल्यास रात्री तसेच सुट्टीच्या दिवशी धान्य काळा बाजारात विकणाऱ्यांना पकडता येईल. (क्रमश भाग - 1)

No comments