न्हावे रावगाव रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या आरसीसी इमारतीचे गुढ कायम न्हावे ग्रामपंचायतच्या बांधकाम परवानग्याची चौकशीची मागणी...!
नामदेव शेलार / मुरबाड : न्हावे ग्रामपंचायतच्या न्हावे सासणे रावगाव कडे जाणाऱ्या रस्त्यावरच एका बिल्डर्सनी आरसीसी इमारत उभी करण्यास घेतली असून त्याला ग्रामपंचायतीने कोणत्या कागदपत्र आधारे बांधकाम परवानगी दिल्या त्याची चौकशी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी तेथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे. तसेच अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्याला तात्काळ निकषित करण्यात यावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
न्हावे सासणे साईबाबा मंदिर समोरील रस्ता रावगाव कडे जातो त्याच रस्त्यालगत एका बांधकाम व्यवसायिकांनी मोठी आरसीसी इमारतीचे बांधकाम सुरू केले आहे बांधकाम करताना त्यांनी एनए ऑर्डर कोणत्या कागदपत्राने मिळवली रस्ते गटारी मोकळी जागा ग्रामपंचायतकडे प्लॅन सादर केलेल्या मध्ये किती क्षेत्रफळाची बांधकाम परवानगी देण्यात आली आहे चारही बाजूला दहा फूट जागा मोकळी सोडून शेजारील घराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वाहनांना अडचण निर्माण होणार असताना ग्रामपंचायतीने आरसीसी बांधकामाला मोजणी नकाशा मधील किती क्षेत्राला मान्यता दिली आहे याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी शेजारील रहिवाशांनी केली आहे.
ग्रामपंचायत स्तरावर आजच्या कालावधीत घरे रस्त्यावर येत आहेत पुढे जाणाऱ्या रहिवाशांना वाहनांना त्रास सहन करावा लागतो सरपंच सदस्य अनेक ठिकाणी आपल्या मनमानीने बांधकामांना प्राधान्य देतात त्यांचा गैरफायदा बांधकाम व्यावसायिक घेऊन ग्रामपंचायतच्या परवानग्यावर मोठे मोठे आरसीसी टॉवर उभे करत आहेत सर्वे नंबरच्या मालकी हक्काच्या जागेत आरसीसी इमारती बांधताना जिल्हाधिकाऱ्यांची एन ए परवानगी लागते सर्व विभागाचे दाखले लागतात परंतु मुरबाड मध्ये पहिले अनाधिकृत बांधकाम करून मोठे मोठे आरसीसी इमारती अकृषीक कर आकारून नियमित केल्या जातात याकडे संबंधित यंत्रणाचे दुर्लक्ष झाले आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे
No comments