web-banner-lshep2024

Breaking News

दीड दिवसाच्या गणेशाचे मुरबाड मध्ये विसर्जन स्वामी समर्थ कलाकृती गणेशाचे प्रथम विसर्जन..!

नामदेव शेलार / मुरबाड :  मुरबाड मध्ये दीड दिवसाच्या गणेश मूर्तीचे मोठ्या थाटामाटात विसर्जन करण्यात आले मुरबाड विकास मंच सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ज्योति शेलार यांच्या घरी बसवलेल्या स्वामी समर्थ गणेश मूर्तीचे प्रथम मुरबाडी नदीत विसर्जन करण्यात आले संध्याकाळी साडेचार वाजल्यापासून गणेश विसर्जन रात्रीपर्यंत सुरू होते. 

 मुरबाड विकास मंच सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा ज्योति शेलार या दरवर्षी वेगवेगळ्या गणेश मूर्तीच्या प्रतिस्थापना करतात लालबागचा राजा, गणपतीपुळे,कोळी बांधवांचा राजा, टिटवाळ्याचा महागणपती, स्वामी समर्थ अशा वेगवेगळ्या वेशभूषा कलाकृती असलेल्या गणेश मूर्ती बसवून भक्तांना आनंदित करत आहेत. 

 नवसाला पावणारा सोन्याचा मुकुटधारी म्हणून त्यांच्या घरामधील गणेशाची भक्तात ओळख आहे. कोकणात साजरा होणारा पारंपारिक गणेश सोहळा सर्व कुटुंब नातेवाईक एकत्र येऊन दरवर्षी साजरा करतात अनेकांच्या नवसाला पावणारा गणेश म्हणून भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्याने भक्त नवस फेडण्यासाठी दरवर्षी आवडीने येतात दीड दिवसाचे गणेश विसर्जन झाल्यानंतर गौरीचे पूजनापासून विसर्जनापर्यंत गौरी गणपती विविध सामाजिक सांस्कृतिक हळदीकुंकू कार्यक्रमाने सन साजरा करतात भक्त मोठ्या प्रमाणात या आनंदात सामील होत असतात.

No comments