नगरसेवक संतोष (बाबू) चौधरी यांनी आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुरबाड शहरात भक्तांना दिले गणेश पूजनाचे साहित्य मोफत..!
नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड नगरपंचायतीचे नगरसेवक संतोष (बाबू) चौधरी यांनी आमदार किसन कचोरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने संपूर्ण शहरांमधील नागरिकांना गणेश मूर्ती पूजनाला लागणारे संपूर्ण साहित्याचे मोफत वाटप केले अगरबत्ती पासून गणरायाच्या टोपीपर्यंत गुलाल,अबीर,कुंकू पासून मोदकांपर्यंत सर्वच वस्तूचे किट बनवून सोबत आरतीचे पुस्तक भेट दिली ज्यांच्याकडे गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तेथे एक दिवस अगोदरच भेट देऊन आमदार किसन कथोरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने उपक्रम राबवला नेहमी प्रत्येक सणाला आगळीवेगळी भेटवस्तू मतदार आणि चहात्यांना देऊन नावलौकिक राहिलेले नगरसेवक संतोष (बाबू) चौधरी आमदार किसन कथोरे यांच्यासाठी आक्रमक राहिले आहेत विकास कामाचा ओघ वाढवून बाजारपेठेतील छोट्या व्यापाऱ्यांचे मित्रदूत बनले आहेत.
छोट्या व्यवसायातून सामाजिक उपक्रम राबवून संतोष (बाबू) चौधरी यांनी आपल्या पत्नीला सुद्धा नगरसेवक केले होते चौधरी दांपत्य यांचा प्रभाग उगळे आळी असताना त्यांनी संपूर्ण शहरातील नागरिकांना शासकीय कामात मदत केली आहे.
मुरबाड शहरासाठी संतोष (बाबू)चौधरी यांना मुरबाड नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्यास शहराच्या विकासात मोठी भर पडणार आहे आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता आरोग्य अभियान रस्ते गटारी ज्येष्ठ नागरिक कट्टा गोरगरिबांना वैद्यकीय मदत प्रशासकीय शैक्षणिक अशा अनेक कामांना गती देण्याचे काम संतोष (बाबू) चौधरी दांपत्यांनी नगरसेवक पदावरून दिल्याने त्यांना नागरिकांचा आशीर्वाद लाभला आहे.
मुरबाड शहरात वृक्ष लागवड मुबलक पाणीपुरवठा डम्पिंग ग्राउंड पथदिवे क्रीडांगण प्रमुख नाले नगरपंचायतीची नवीन इमारत अन्य सोयीसुविधा विकास करण्यासाठी संतोष (बाबू)चौधरी यांचा पुढाकार आहे शहराच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची भूमिका शहरातील व्यापारी नागरिकांना अभिमानास्पद वाटत आहे.
मुरबाड नगरपंचायतीच्या विविध नवनवीन उपक्रमांत त्यांचा सहभाग असतो शहरातील वाढती लोकसंख्या त्यांना भेडसवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आमदार किसन कथोरे यांनी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली संतोष (बाबू) चौधरी नगरसेवक काम करत आहेत.
No comments