web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड शहरात शुक्रवारी कोट्यावादीची उलाढाल गणेशोत्सवाची खरेदीसाठी बाजारपेठेत तुडुंब गर्दी पोलिसांचा चौक बंदोबस्त..!

नामदेव शेलार/ मुरबाड :  गेले काही दिवस पावसाच्या अडचणीने आणि मासिक पगारासाठी थांबलेल्या गणेशोत्सवाच्या खरेदीला शुक्रवारी मुरबाड बाजारपेठेत तुटुंब गर्दी झाली होती यापूर्वी अशी गर्दी केव्हाही झाली नव्हती शुक्रवारची गर्दीत झालेली कोट्यावधीची उलाढाल रेकॉर्ड ब्रेक होती असे व्यापारी आणि ग्राहकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

 मुरबाड शहरांमधील चाऱ्या बाजूचे रस्ते पॅक झाले होते बाजारपेठेत येणारे माता नगर गणेश नगर माळीपाडा छत्रपती संभाजीनगर शेळके पाडा म्हसा रोड तीन हात नाका मुख्य बाजारपेठ या रस्त्यावरून वाहने बाजारपेठेत येण्या जाण्यासाठी जागा नव्हती मुरबाड पोलिसांनी संपूर्ण बाजारपेठेत चोक बंदोबस्त ठेवला होता पोलीस अधिकारी प्रसाद बाबर पोलीस अधिकारी महाडिक सावंत खोमणे त्यांचे अन्य सहकाऱ्यांनी मुरबाड बाजारपेठेत पेट्रोलिंग करून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेतली. 

 हार,फुले,केवढा, दुर्वा,बेल,नारळ, अगरबत्ती,गणपती मकर सजावट ,भाजीपाला विविध वस्तूंची दुकाने रस्त्यांच्या कडेला लागल्याने बाजारपेठेत नागरिकांना चालण्यासाठी जागा नव्हती मुरबाडचा शुक्रवारी बाजार भरतो त्याची होणारी गर्दी आणि मासिक पगार गणपतीच्या सणावर झाल्याने खरेदीसाठी तुडुंब गर्दी बाजारपेठेत झाली होती कोटी रुपयाची उलाढाल झाली आहे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दीचा उच्चांक होता मुरबाड तालुका स्तरावरील एकमेव मुख्य बाजारपेठ असल्याने येथे कपडे मिठाई विविध वस्तू एकाच ठिकाणी मिळतात तालुक्यातील 350 गावे वाड्या-पाडे मधील लोक बाजारात खरेदीसाठी येतात त्यामध्ये शुक्रवारच्या बाजारात भाजीपाला लसूण टोमॅटो कांदे बटाटे जीवनावश्यक वस्तू स्वस्त दरात मिळतात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरणारा शुक्रवारचा बाजार यावेळी रस्त्यावर विखुरलेला होता कारखान्यात काम करणारे कामगार यांना असणारी सुट्टी तसेच मासिक पगार झालेले शासकीय निमशासकीय चाकरमानी यांची एकत्रित खरेदीसाठी झालेली गर्दीने गेल्या अनेक वर्षांचा रेकॉर्ड मोडला आहे दुसरीकडे गणपती मूर्ती घेऊन जाणारे भक्तगण यांची संध्याकाळी झालेली गर्दी रात्री उशिरापर्यंत बाजारपेठेत दिसून आली.

No comments