महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद मागे;तर न्याय देण्यातही न्यायालयाने तत्परता दाखवावी - उद्धव ठाकरे
मुंबई : बदलापुर अत्याचार प्रकरण दडपण्याचा प्रकार झाल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक दिली त्यामुळे राज्यातील महायुती सरकारला धडकी भरताच सरकार पुरस्कृत लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली त्यावर कोर्टाने कोणत्याही पक्षाला बंद करण्याचा अधिकार नाही. तरीही बंद झाल्यास कायदेशीर कारवाई करा.असे आदेश दिल्या नंतर आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम करणार नाही. आमचा बंद शांततेच्या मार्गानेच होणार. आम्हाला निषेध नोंदविण्याचा अधिकार आहे तो आम्ही शांतता पुर्वक पाळणार आहोत. न्यायालयाचा आदर करीत आम्ही काळ्या फिती लावून राज्यभरात एक तास निषेध आंदोलन करणार असल्याचे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले तर जनतेने उत्फुर्थ बंद केल्यास आम्ही जबाबदार नाही. असे ठामपणे सांगितले.
उच्चन्यायालयाच्या
निर्णयाचा आदर ठेवून बदलापुर मधील चिमुकल्यावरील अत्याचार प्रकरणी उद्या
२४ तारखेला ११ ते १२ वाजेपर्यंत महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते तोंडाला
काळ्या पट्या हातात काळे झेंडे घेऊन सकाळी ११ वाजता ठाणे येथे आंदोलन करणार
आहेत. राज्यातील प्रमुख शहारात आमचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते शहरातील
नाका नाक्यावर गाव तालुक्या ठिकाणी तोंडावर काळ्या पट्ट्या हातात काळे
झेंडे घेऊन आंदोलन करणार असल्याचे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी
सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांनी उद्या होणारा बंद मागे घेतला असून बंद मागे घेण्याच्या बाबतील
न्यायालयाने जेवढी तत्परता दाखविली तशीच तत्परता या प्रकरणी न्याय
देण्यासंबधात दाखवावी. अशा शब्दात ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
न्यायालयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाता आलं असतं मात्र पुरेसा वेळ
नाही. आम्ही बंद करा म्हणजे तोडफोड करा बेकायदेशीर पणे काही करा असे काही
नव्हतं उत्फुर्थपणे बंद करा शांततेने बंद करा असं आवाहन केलं होते. त्याला
आता तुम्ही मनाई केली तर तोंडं बंद करून बसतो. मात्र राज्यातील अत्याचारा
विरोधातले आंदोलन थांबणार नाही असे ठाकरे म्हणाले. आमच्या बंद विरोधात दे
कोणी कोर्टात गेले जे कोणी याचिकाकर्ते आहेत त्यांच्यावर या अत्याचाराची
जबाबदारी आहे. यातील पिडीतेला न्याय देण्यासाठी त्यांनी प्रयत्न
करावेत.असेही ठाकरे यांनी याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्तेंचं नाव न घेता
सुनावले.
बंद करायचा नाही, संप करायचा नाही केला तर
ते बेकायदेशीर ठरविले जात असेल तर मग अशा प्रसंगी लोकशाहीत कोणत्या
पद्धतीने व्यक्त होण्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी काय करावे लागेल
म्हणजे त्याला मान्यता मिळेल असे ठाकरे म्हणाले. मी उद्या २४ तारखेला
शिवसेना भवना समोरील चौकात तोंडाला काळी पट्टी आणि हातात काळा झेंडा घेऊन
बसणार आहे. असे ठाकरे म्हणाले.
ठाणे येथे कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पुणे येथे शरद पवार यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन होणार आहे.
No comments