मुरबाड मध्ये रोशनच्या गुटख्याला तेजी कारवाई शून्य...!
रोहित शिंदे / गौरव शेलार - मुरबाड : प्रतिबंधित गुटखा बंदी असल्याने तालुक्यात गुटखा विक्री स्कूटी बाईक वर जोमाने सुरू आहे.मुरबाड शहरात तारा गुटखा सह अन्य गुटखा विक्री होत असताना यंत्रणेला हप्ते बाजीने हे गुटखा किंग गल्ली गल्ली मध्ये किराणा दुकान सह पानटपरी वर खुले आम गुटखा मिळत आहे.साधा गुन्हा जरी घडला तरी संपूर्ण तालुक्यात चर्चा होते मात्र रोशनच्या गुटख्याची चणचण असताना तो खुले आम गोरख धंदा करत असताना कारवाई मात्र होताना दिसत नाही.
तसेच रोशन नामक घरातून सुध्दा हा तारा गुटखा विक्री करत असल्याचे समजत आहे.सदरील तारा गुटख्याचा बिग बॉस किंग कुडवली एमआयडीसी मधील असून कंन्टेनर मधून हा गुटखा मुरबाड तालुक्यात आणले जात असल्याची माहिती आहे.
एकादी घटना घडल्यावर आंदोलन केलं की पोलिसांना जाग येते मात्र येवढं मोठा प्रतिबंध गुटखा विक्री होतो आणि यंत्रणा सुस्त बसते हे मात्र गुलदस्त्यात आहे.सद्या मुरबाड शहरात चोरी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.त्याला यंत्रणेचा धाक राहिला नाही कुठल्याच प्रकरणात पोलिसांचा वचक राहिला नाही असे प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहेत.
No comments