web-banner-lshep2024

Breaking News

दहीहंडीच्या मडक्यातून मुरबाड विधानसभेचे लोणी गोकुळाष्टमी उत्सवात लावणी स्टेजवरून सुभाष पवार यांचा आमदारकी शुभारंभ;दुसरीकडे राष्ट्रवादीचे बाल्यामामांच्या सोबत भाजपाच्या कथोरेंचा फोटो..!

नामदेव शेलार / मुरबाड : निवडणुका तोंडावर आल्याने मुरबाड विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला असून सत्ताधाऱ्यात उमेदवारी कलगीतुरा उमटला आहे. गोकुळाष्टमीच्या दहीहंडी उत्सवाने मुरबाड मध्ये दहीहंडीच्या मडक्यातून विधानसभेचे लोणी चाखण्याचा प्रयत्न झाला गोपाळांसमोर उभारलेल्या लावणी स्टेजवरून सुभाष पवार यांनी आमदारकीच शुभारंभ केला तर दुसरीकडे दहीहंडी उत्सव स्टेजवर शरद पवार गटाचे बाल्या मामा सोबत भाजपा आमदार किसन कथोरे यांचे फोटो आयोजकांनी लावल्याने मुरबाडच्या राजकारणाची निष्ठा पळापळी होण्याची चिन्ह दिसत आहे. विशेष म्हणजे शिंदे शिवसेनेचे सुभाष पवार यांच्या स्टेजवरून आमदार सुभाष पवार होणार अशी बोंबाबोंब होताना त्यांच्या स्टेजवर उद्धव ठाकरे गट शरद पवार गट भाजपाचे कार्यकर्ते यांनी हजेरी लावल्याने येत्या विधानसभेचे चित्र विचित्र दिसून येत आहे. 

    नुकतेच सुभाष पवार समर्थकांचा शिवसेनेतून भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत टोकावडा येथे भाजपा प्रवेश झाला मात्र सत्ताधारी शिंदेसेना भाजपा दोन्हीही दावेदारांनी विधानसभेची तयारी केली आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघात एकमेका विरोधात लढलेले आमदार किसन कथोरे भाजपा सुभाष पवार शिंदे शिवसेना प्रमोद हिंदुराव अजितदादा पवार राष्ट्रवादीमध्ये एकत्र सत्तेत आहेत विरोधी पक्षाकडे स्थानिक चेहरा समोर आलेला नाही उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस तीनही पक्षाचा उमेदवार कोण ठरणार सत्ताधाऱ्यांपैकी कोण उमेदवारीसाठी पळापळी करणार ज्याचा लवकरच विरोधी पक्षाच्या दालनात उमेदवारीसाठी प्रवेश करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    मुरबाड विधानसभेला भाजपाची पक्कड होती परंतु लोकसभा निवडणुकीत भाजपा मधील गटबाजी उघड उघड झाली आहे लोकसभेत शरद पवार यांच्याकडे खासदारकी गेली अपक्षाला प्रचंड मते पडली त्याचा फायदा कोणत्याही पक्षाला नव्हे व्यक्तीला होणार आहे असे पक्षीय वरिष्ठांसह कार्यकर्त्यांना आहे मात्र मतदारांना नेहमीच पक्ष दल बदलू उमेदवार आवडत नाहीत अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. मुरबाड विधानसभेत कल्याण ग्रामीण बदलापूर शहर अंबरनाथ ग्रामीण आणि संपूर्ण मुरबाड तालुक्याचा समावेश आहे मुरबाड तालुक्यात जेवढे मतदार संख्या वाढली आहे तेवढीच मतदार संख्या बदलापूर मध्ये वाढली आहे त्यामुळे गटतटाचा फायदा घेण्याचे काम प्रत्येक उमेदवार करणार असल्याचे दिसत आहे. गेल्या पंधरा वर्षाच्या तीन निवडणुकीत एकमेकात लढलेले उमेदवार आता एकत्र सत्तेत आहेत परंतु प्रत्येकाला आमदार बनायचं आहे.

    निवडणुकीच्या तोंडावर पक्षात येणारे कार्यकर्ते पुढील जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक उमेदवारी मिळवण्यासाठी आत्ताच तयारीला लागले आहेत अनेक ठेकेदार शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांच्या समोर पक्षप्रवेश करण्यासाठी जाण्यास तयार होत नाहीत परंतु मुरबाड विधानसभा हा ठेकेदारांची रोजी रोटी असलेला मतदार संघ आहे सामान्य कार्यकर्त्याला कोणत्याही स्वाराज्य संस्थेत उमेदवारी मिळत नाही आणि ठेकेदारी दर पाच वर्षांनी ठेकेदार नेत्यांना बदलतात त्यांनाच नेते सुद्धा पुढे पुढे करण्याची संधी देतात पण येत्या विधानसभा निवडणुका जवळ आल्याने पक्षप्रवेश करण्याची गोची झाली आहे. 

    मुरबाड विधानसभेत माजी आमदार गोटीराम पवार आणि आत्ताचे आमदार किसन कथोरे दोघांचीच ताकद आहे दुसरा कोणीही उमेदवार यामध्ये दोघांपैकी एकाची मदत घेतल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही हेच दोघे आजी,माजी,आमदार, भिवंडी चा खासदार ठरवतात अशा मतदारसंघात मतदार कोणता नेता निवडायचा त्यांच्या विकासाची तुलना सामाजिक एकता प्रत्येकाच्या पाठीशी उभा राहणारा नेता म्हणून विचार विनमय करतात मुरबाड विधानसभेत सामाजिक समीकरणे ग्रामीण भागात लवकर जुळून येतात त्यामुळे इच्छुक अनेक येतील मात्र आमदार एकच होणार आहे. (भाग -1)

No comments