साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडून अभिवादन
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद पवार,कक्ष अधिकारी संभाजी जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे यांनीही अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी लोकशाहीर साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चेंबूर येथील स्मारकास भेट देऊन लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक कृती समितीचे पदाधिकारी, प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





No comments