आतकोली पठारा मधील अवैद्य दगड खाणीवर कारवाईसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदारांना आदेश ब्लास्टिंग स्फोटकाची चौकशी व्हावी शेतकऱ्यांची पोलीस महासंचालकांकडे मागणी....!
नामदेव शेलार / ठाणे : समृद्धी महामार्ग रिंगण आमणे पडघा येथील भादाणे आतकोली येथील सर्वे नंबर 172/1 आणि शासकीय गुरचरणीमध्ये बेकायदा सुरू असलेल्या दगड खदानीची चौकशी करून कारवाईचे आदेश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले आहेत तलाठी सजा आमने मंडळ अधिकारी पडघा यांच्या हद्दीत गेले काही वर्ष विनापरवाना दगडखानी सुरू आहेत त्याची माहिती संबंधित यंत्रणांना असताना दगडखान चालकाविरोधात काहीही कारवाई होत नाही
भादाने येथील सर्वे नंबर 172/1 मध्ये धनदांडग्यांच्या दगडखाणी रात्र दिवस सुरू आहेत तेथील शेतकऱ्यांचे शेतामधील माती दगड चोरून नेले असल्याने शेतकऱ्यांनी महाराष्ट्र सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे सर्वे नंबर 172/1 मध्ये सात एकरामध्ये तीस फूट खोल दगडाचे उत्खनन ब्लास्टिंग (स्फोटके) वापरून केली आहे.तसेच सरकारी 50 एकराच्या वर जमिनीवर दगड खाणी काढून कोटी रुपयांची रॉयल्टी चोरी केली आहे. तलाठी सर्कल यांचे पंचनामे बनावट करून मोजणी अधिकाऱ्यांना हाताशी धरून दगड माती वाहतूक रात्र दिवस सुरू आहे.
ब्लास्टिंग करताना स्फोटकाचा आवाजाने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे दगड खाण्यासाठी एवढा स्फोटकाचा साठा कुठून आला त्याची चौकशी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पोलीस महासंचालक यांच्याकडे केली आहे. वाशेरे आणि परिसरातील खडी मशीन क्रेशर वर अवैद्य दगड डंपरच्या वाहतुकीने जातो दगड काढण्यासाठी पोखलन जेसीबीचा वापर होत असून समृद्धी महामार्गाला बनावट शेतकऱ्यांच्या नावाने रॉयल्टी काढून मातीची चोरी केली आहे.
सत्ताधाऱ्यांच्या नावाने दगडखानी धारकांना महसुली तसेच अन्य अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने शासनाची शेकडो कोटीची रॉयल्टी चोरी झाल्याचे तेथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आहे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनी तात्काळ तहसीलदार भिवंडी यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.



No comments