मुरबाड मध्ये नवीन ‘’तारा’’ गुटख्याचा उगम;यंत्रणेचा ''ना सुनो' ''ना बोलो' ''ना देखो' कानमंत्र
रोहित शिंदे / कल्याण : मुरबाड तालुक्यासह शहरात मागील वर्षी प्रतिबंधीत विमल हा गुटखा जास्त प्रमाणात विक्री होत होता त्यावर स्थानिक यंत्रणेचे लागेबंध असल्याने हा गुटखा जोमाने विक्री होत असल्याने किन्हवली येथील पोलिस पथकाने मुरबाड मध्ये धाड टाकून येथील प्रतिबंधित गुटखा पकडला होता.त्यानतंर आज मार्केट मध्ये नवीन गुटख्याचा उगम झाला आहे.
‘’तारा गुटखा’’ हा गुटखा सध्या मुरबाडच्या गल्ली बोलात प्रत्येक टपरीमध्ये पहाण्यास मिळत असून याकडे यंत्रणेचे का कानडोळा होत आहे की हप्तेबाजीने हा तारा गुटखा डिलींग होत आहे. असा सवाल येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.प्रतिबंधित गुटखा असून हा तारा गुटखा किंग कोण? याला कोणाचा वरदहस्त आहे त्याला कोण पाठीशी घालत आहे याचा बोध मात्र गुलदस्त्यात आहे.
सदरील गुप्तचार यंत्रणा ही सुई पडल्यापासुन ते दहशतवाद अशा वर बारकाईने लक्ष ठेवून असते मात्र त्यांना ‘’तारा गुटखा’’या प्रतिबंधित गुटखा किंग डिलर यांचा शोध का लागत नाही हे मात्र एक प्रश्न चिंन्ह आहे. मात्र याकडे आता वरिष्ठ पातळीतील यंत्रणेने लक्ष वेधावे अशी मागणी होत आहे.



No comments