न्यायासाठी भटकंती साहेब आज तुम्ही हवे होते...
1980 चा कालावधीपासून 1995 पर्यंत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सत्ता, सिह्यसना विरोधात शिवसेना लढली त्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा प्रामुख्याने समावेश होता त्याचं कारण सर्वांचे न्यायदेवता म्हणून धर्मवीर आनंद दिघे साहेब होते. आम्हाला शालेय जीवनापासून निपक्ष समाजसेवा संघर्ष करण्याचे बळ स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यामुळे मिळाले ठाण्याचा टेंभी नाका गरिबांचा न्यायालय होतं शिक्षण नोकरी सुरक्षा कवच देणारी सावली होती साहेबांच्या आजूबाजूला असणाऱ्यांना आम्ही फार जवळून पाहिलेत पण आता साहेब आम्हाला न्यायासाठी भटकंती करावी लागत आहे. माळशेज घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या मुरबाड सह शहापूर भिवंडी वाड्याच्या ग्रामीण भागातून स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडे न्यायासाठी गेल्यावर न्याय मिळतच होतं त्यांच्या आशीर्वादाने येथील अनेक तरुण-तरुणी शिक्षण नोकरी विविध क्षेत्रात घडले आणि सामाजिक चळवळ उभी राहिली प्रत्येकाच्या पायावर उभे राहणारा कार्यकर्ता गाव परिसरातील वृद्ध माता-भगिनी भावाची सामाजिक सेवा करत होते परंतु साहेब तुम्ही आमच्यातून निघून गेल्यावर आमच्या रानमाळाचा कचरा डेपो झाला साहेब तुम्ही हवे होते आता ...!
सामाजिक स्तर राजकारणात पैसा सत्ता खुर्चीकडे वळला कोणी कोणाचा विरोधक नाही राहिला पिढ्यान पिढ्या साम्राज्य उभे करणाऱ्या नेत्यांनीच सामान्य वर अन्याय केला गरिबांची बाजू सावरण्यासाठी कोणी पुढे येत नाही याचवेळी तुम्ही असते तर साहेब आम्हाला न्याय मिळाला असता म्हणून साहेब तुम्ही भिवंडीकरांना हवे होते तुम्ही मुरबाड शहापूरचं ठाणे पालघर जिल्ह्याला हवे होते. शिक्षणासाठी नोकरीसाठी अन्या अत्याचारासाठी प्रत्येक माणूस भटकंती करत आहे राजकारणी सत्ताधीश पुढारपणाला लगाम घालण्यास त्या त्या पक्षाचे वरिष्ठ नेते कमी पडू लागली आहेत गटाच्या बाजीने आणि सत्तेच्या माजी ने अनेक गोरगरीब शेतकरी नागरिक सामाजिक पत्रकार कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल होतात दबाव तंत्र निर्माण होतो त्यांच्या तक्रारी समस्या यांना प्रशासनात न्याय मिळत नाही सत्ताधारी पुढारीपणा करणारे अधिकाऱ्यांची बाजू घेतात साहेब तुम्ही असतात तर असे कधीच घडलं नसतं रस्त्यावरचा खड्डा आणि भ्रष्टाचाराचा अड्डा उधळून लावून श्रीमुख दर्शन घडवलं असतं म्हणून साहेब तुम्ही हवं होते.
1995 साली पहिली युतीची सत्ता आली.स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांसोबत आम्हा मुरबाडच्या तीन पत्रकारांची बैठक झाली त्यावेळी खासदार कै.प्रकाश परांजपे यांना साहेबांनी निवडून आणलं त्यावेळीच्या आठवणी आजही अश्रू दाटून येतात मुरबाडच्या गॅंगवॉरचा भीमोड करण्याचा प्रयत्न तेव्हा ज्येष्ठ पत्रकार नामदेव शेलार यांनी केला त्यावेळी पोलीस संरक्षण देण्याचे पत्र तुमच्याकडून मिळालं मुंबईचे महापौर शरद आचार्य यांना माझ्याबद्दल दिलेले पत्र त्यांची माझी झालेली भेट आजही तुमच्या सामाजिकतेची जाणीव करून देत आहे. ठाणे जिल्ह्यात स्वर्गीय आनंद दिघे, शाबीरभाई शेख आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी आमच्यासारख्या तरुणांना दिलेले सामाजिक बळ आज अर्धशतक संघर्ष योद्धाच्या भूमिकेत जोपासले जात आहे.मात्र साहेब तुम्ही असता तर आमच्या ठाणे जिल्हा ग्रामीण भागाला न्याय मिळाला असता. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यामधील आतकोली,वाशेरे, पिसे,चिराडपाडा,आमने या गावांच्या लगत शासनाची गुरचरण जमीन आम्हा गावकऱ्यांच्या गुरे चरण्यासाठी होती ती जमीन आज ठाणे महानगरपालिकेने कचरा डेपो साठी घेतली आहे. माणसांच्या जीवनावर आरोग्य मारून जनावरांच्या तोंडामधील गवताचा घास काढून घेतला जातोय आणि सारे नेते आमदार खासदार आघाड्या तिघाड्या काहीही बोलत नाहीत. स्थानिकांचा विरोध आहे ग्रामपंचायतींचा ग्रामसभा ठराव आहे पत्रव्यवहार केला असताना राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री तेथे येऊन खड्डे बघून गेले परंतु आतकोली पठारावर अन्यायाचे अड्डे बघितले नाही साहेब खरंच आज तुम्ही हवे होते...!
कारण आम्हाला न्यायाची भटकंती करायला लागली नसती आम्ही पडघ्यापासून महाडच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रह कार्यक्रमापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन गोपीनाथजी मुंढे आणि स्वर्गीय आनंदजी दिघे साहेबांच्या प्रबोधनातून प्रेरक बनलो आहोत मात्र सत्ता आणि पैशाच्या जोरावर कोणी आमच्या दगड मातीची चोरी करतो स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर कब्जा करतो दगड खदानीचा धंदा करतो आम्हाला न्यायासाठी वनवन फिरावे लागते म्हणून साहेब तुम्ही आज हवे होते. ठाणे महानगर पालिकेला आतकोली पठारावरील जमीन का हवी 50 किलोमीटर अंतरावर कचरा वाहतूक कशासाठी येथील लोक सुद्धा सेनानी आहेत त्यांच्या पाठबळाला मुख्यमंत्री धावले पाहिजेत अशी अपेक्षा सर्वांनाच आहे मात्र तसं घडलं नाही तर साहेब तुमची आठवण सतत खवळत मन पिळवटत राहील साहेब...!
No comments