web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड तालुक्यातील डॉक्टरांनी कोलकाता येथील दुर्दैवी घटनेचा केला निषेध..!

मुरबाड: कोलकाता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या अमानुष अत्याचारा विरोधात मुरबाड तालुक्यातील सर्व डॉक्टर्स असोसिएशन, प्राव्हेट दवाखाने,हॉस्पिटल,डॉक्टर्स सह संपूर्ण देशातील वैद्यकीय सेवा (ओपीडी) शनिवार दिनांक १७/०८/२०२४ रोजी जाहीर निषेध करत बंद पुकारला होता.यावेळी मुरबाड तालुक्यातील डॉक्टरांनी सर्वत्र बंद पाळत निषेधवेक्त करून  मुरबाड पोलिस्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबर यांना डॉ.किरण झवर डॉ.पारधी,डॉ.येलवे,डॉ.पांडे,डॉ.जितेंद्र बेंडारी, डॉ. शेळके,डॉ.मुकेश पाटील,डॉ.प्रमोद पष्टे,डॉ.चेतन खरे,डॉ.संदीप भालेराव,डॉ.धीरज श्रीवास्तव यांनी निवेदन दिले.

दिवसेंदिवस महिलांनवर अत्याचार घडण्याच्या घटना वाढत चालल्या असून शासना कडून कुठलीही कारवाही होत नसल्याने गुन्हे गारांना पाठीशी नं घालता त्यांच्या वर कठोर कारवाही व्हावी याबाबत निषेध वेक्त केला.कोलकाता येथील 31 वर्षीय महिला डॉक्टर जो अत्याचार झाला आहे त्याचे पडसाद संपूर्ण जगभरता उमटत आहेत. घडलेल्या घटनेचा निषेध वेक्त करावा तेवढा कमीच आहे पुन्हा अश्या दुर्दैवी घटनाची पुणाराव्रत्ती होऊ नये याकरिता संपूर्ण डॉक्टर्स असोसिएशन, प्राव्हेट दवाखाने,हॉस्पिटल,डॉक्टर्स सह संपूर्ण देशातील वैद्यकीय सेवा (ओपीडी) इमर्जन्सी सेवा वगळता निषेध वेक्त करून बंद पुकारला होता.

          

No comments