भिवंडी येथील सावद नाक्यावर रिक्षा चालकांची दादागिरी शिविगाळ मुजोरी...!
गौरव शेलार / भिवंडी : सध्या कल्याण भिवंडी मध्ये रिक्षा चालकांची मनमानी दिवसांदिवस वाढत चालली असून प्रवाशी वैतागले आहेत.अशाच काहीसा प्रकार भिवंडी मधील सावद नाक्यावरचा आहे गोर गरीब महिला पुरूष शालेय विद्यार्थी वेळेनुसार येईल त्या गाडीत बसतात मात्र येथील सावद नाक्यावर रिक्षावाले दादागिरी शिविगाळ करून आमच्या रिक्षात बसावे अशी दादागिरी करतात महिलांना अपमानित करतात असे प्रकार वाढले आहेत त्याकडे संबिधत यंत्रणाचे दुर्लक्ष झाले आहे.
सावद येथील रिक्षा चालक एक खाकी वर्दीत दुसरा टीर्शट मध्ये तीसरा माळकरी तर चौथा सिव्हील डे्रसमध्ये होता या चौघे रिक्षावाल्यांनी सावद जाणवळ नाक्यावर आपली भोंदूगिरी दाखवली मात्र त्यांच्या दादागिरीला आरपीआय कार्यकर्त्यांनी दाद दिली नाही.आरपीआय कार्यकर्ता यांच्या कुटंबातील महिलांना कोणीही गाडीत घेऊ नये त्यांना लिफ्ट देऊ नये यासाठी सावद येथील रिक्षा चालक दादागिरी करत असून संबधितावर आरपीआय कार्यकर्ता यांनी रिक्षाचालक यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्ट गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे.
आटीओ ने विना परमिट,जादा प्रवाशी वाहतूक, विना लायसन्स मुदत संपलेल्या रिक्षा चालक आणि प्रवाशीना दादागिरी शिविगाळ करणार्या सावद रिक्षा चालकावर पोलीस,आरटीओ अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सुरेश भालेराव यांनी केली आहे.
No comments