लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची फरफट बँक खाते दिलेल्या बँकेत पैसे आलेच नाहीत भावावर बहिणीची नाराजी...!
नामदेव शेलार / मुरबाड : 200 कोटी जाहिरातीवर खर्च करून लाडकी बहीण योजना सुरू केली बहिणीला महिन्याला पंधराशे रुपये मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांनी 15 ऑगस्टला सुरू केले.परंतु बहिणीने दिलेले बँक खात्यात पैसे आलेच नाहीत दुसऱ्या बँकेत पैसे जमा झाल्याने पैसे काढण्यासाठी बहिणीची फरफट सुरू झाली आहे.
सदरचा प्रकार मुरबाड सह अन्य शहरांमध्ये घडला असून भावावर बहिणीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.कागदपत्रे केवायसी करण्यासाठी महिलांची तुफान गर्दी बँकेत झाली आहे सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करून पहिले बहिणीची मने जिंकली मात्र पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये तुफान गर्दी बँकेचे नेटवर्क बंद पडले केवायसी अडथळ्याने बहिणीची फरफट झाली.ज्या बँकेत खातं होतं केवायसी केली होती त्या बँकेत पैसे आलेच नाहीत.ज्या बँकेत खातं बंद होते केवायसी नव्हती अशा बँकेत बहिणीचे 3000 जमा झाल्याने त्यांना पुन्हा बँक खाते उघडण्याचे सांगण्यात येत असून केवायसी करण्याची गरज आहे. तेथील बँकेत काही कालावधीने पैसे मिळणार असल्याने बहिणींना भाऊबीजची भेट गणपतीला मिळणार की नाही अशी भीती निर्माण झाली आहे.
बहिणीसाठी तिघा भावांनी बँका वाटून दिले आहेत.स्टेट बँक ऑफ इंडिया ,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ॲक्सिस बँक ,बडोदा बँक अशा बँकांना प्रथम प्राधान्य दिले असून ग्रामीण शहरी भागात सर्वात जास्त खात असलेली बँकेचे योजनेतील फॉर्ममध्ये जनता सहकारी बँकेचे खाते दिल असताना अनेकांना बँकेत पैसे जमा झाले नाहीत.ॲक्सिस बँकेत खातेदारांना चेकने पेमेंट दिले जाते त्यामुळे खातेदारांना बँकेच्या ठेवीत डिपॉझिट म्हणून पहिल्या हप्त्याचे पैसे ठेवावे लागणार असून बंद खातेदारांना पुन्हा खाते काढावे लागणार आहेत .
त्यासाठी कागदपत्र फरफट होत असल्याने बहिणीची भावावर तीव्र नाराजी उमटू लागली आहे. काही बँकेत ग्राहकांना चांगली सेवा मिळत नसल्याने खातेदार जात नाहीत बंद खातं चालू करण्याची किमया लाडकी बहीण योजनेने केली आहे अशा एक्सिस बँक कोणाची ,ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कोणाची ,बडोदा बँक कोणाची बहिणीची फरफट म्हणजे योजनेत घोडबंगाल तर नाही ना असा सूर उमटला आहे. उल्हासनगरच्या महिलेने खात दिलं मात्र उल्हासनगरचे पैसे पाठवले बदलापूरच्या बडोदा बँकेत अशीच फरफट मुरबाड मध्ये महिलांची झाली आहे. मात्र सदरील पैसे परत शासन जमा करतील म्हणून महिलांनी बँकेत एकच गर्दी केली असल्याने तसे काही होणार नसल्याचे काही जाणकारांचे मत आहे.
No comments