web-banner-lshep2024

Breaking News

Bigg Boss Marathi Season 5: सूरज चव्हाणचं रौद्ररुप, अरबाजला दिली थेट ताकीद

Bigg Boss Marathi Season 5: सूरज चव्हाणचं रौद्ररुप, अरबाजला दिली थेट ताकीद. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी टास्क जोरात सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या टास्कमध्ये निक्की, अरबाज, जान्हवी, योगिता, सूरज, निखिल यांच्या ‘ए’ टीमने बाजी मारली, ज्यामुळे या टीममधल्या सात स्पर्धकांना कॅप्टनसीच्या उमेदवारीसाठी संधी मिळाली आहे. सध्या घरात ‘फास्ट फूड’ हा नवीन टास्क पार पडत आहे.

    ज्यामध्ये सूरज चव्हाण पहिल्यांदाच आपलं रौद्ररुप दाखवताना दिसत आहे. सूरज आणि अरबाजमधील वादात वैभवने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण सूरजने थेट त्याला ठणकावून सांगितलं, “त्याला हाणलं नाहीये मी अजून…माझं मी बघेन.” 

    या प्रोमोमध्ये सूरज, निक्की, जान्हवी, आणि अरबाजशी भांडताना दिसतो, ज्यामुळे मराठी कलाकार आणि नेटकरी सूरजच्या धाडसाचं कौतुक करत आहेत. ‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्यात सूरजने केलेल्या धाडसी खेळीमुळे तो चर्चेत आहे आणि त्याचे चाहते त्याला प्रचंड पाठिंबा देत आहेत.

No comments