तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण स्वतंत्र सेनानी नातेवाईकांचा सत्कार...!
गौरव शेलार / मुरबाड : स्वतंत्र्याच्या 78 वा ध्वजारोहण सोहळा तहसीलदार अभिजीत देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी तहसीलदार अभिजीत देशमुख शिवसेना सह संपर्कप्रमुख सुभाष दादा पवार (शिंदे गट) यांच्या हस्ते स्वतंत्र सेनानी यांच्या नातेवाईकांचा सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्याचा आनंद उत्सव आणि शासनाच्या विविध कार्यकारी योजना ची माहिती तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी यावेळी दिल्या.शिंदे सेनाचे तालुकाप्रमुख प्रकाश पवार,नायब तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, राजकीय, सामाजिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद बाबर,पोलीस निरीक्षक महाडिक यांचे सहकारी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी ध्वजाला सलामी दिली.यावेळी तहसीलदार कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत महाराष्ट्र गीत गायले.
No comments