web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडचा तीन हात नाका ओळख बुजणार;राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपूल बांधकामाला सुरुवात उड्डाण पुलाला शांताराम भाऊ घोलप यांचे नाव देण्याची मागणी...!

नामदेव शेलार / मुरबाड : मुरबाड कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गाचे काम जलद गतीने सुरू असून मुरबाडच्या तीन हात नाक्यावर भव्य उड्डाणपुलाचे काम सुरू आहे या पुलाला माझी महसूल मंत्री शांताराम भाऊ घोलप उड्डाणपूल असे नाव द्यावे अशी मागणी मुरबाड वासियांनी शासनाकडे केली आहे. मुरबाड चा तीन हात नाका प्रत्येक आंदोलकांचा मुख्य ठिकाण होता. प्रत्येक मिरवणूक तीन हात नाक्यावरून निघत होती मुरबाड कल्याण शहापूर कर्जत माळशेज घाट नगर पुणे या मार्गे वाहने याच तीन हात नाक्यावरून जात होती.

     यापुढे तीन हात नाक्याची ओळख बुजणार आहे. आंदोलकांना पुलावर बसून आंदोलन करावा लागणार आहे कल्याण कडून येणारी वाहने नगर पुणे मार्गाने पुलावरून थेट जाणार असल्याने तीन हात नाका एसटी स्टँड लगतच्या व्यवसायावर सुद्धा परिणाम होणार आहे कल्याण कडून येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा उड्डाण पूल मुरबाडच्या जुन्या पेट्रोल पंपापासून सुरू होऊन शेवटचा नवीन पेट्रोल पंप ओरिएंटल कंपनी पर्यंत बनवला जात आहे पुलाची हद्द नगरपंचायत मध्ये असल्याने त्यांच्या विकास आराखड्यामध्ये पर्यायी रस्त्यासाठी साईट रोड बनवावे लागणार आहेत. 

   मुरबाड एसटी स्टँड समोर उड्डाणपुलाचे स्ट्रक्चर (खड्डे) उभे राहत असून मुरबाड एसटी डेपो चे प्रमुख दर्शन म्हसा रोड पूर्वीला झाल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे नगरपंचायत मुरबाड चा डीपी आर प्लॅन अध्याप मंजूर झालेला नाही तसेच शहापूर कर्जत राष्ट्रीय जेएमपीटी रस्त्याचा शहरातील काम अपूर्ण असल्याने एमआयडीसीमध्ये येणाऱ्या मालवाहतूक वाहनाने वाहतूक कोंडी होणार आहे मुरबाड म्हसा रोड नवीन नाका निर्माण झाल्यावर तहसीलदार कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांच्या अडचणी वाढणार आहेत मुरबाड शहरांमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असणारे तहसील कार्यालय एमआयडीसी औद्योगिक वसाहतीमध्ये नेण्यात आल्याने ज्येष्ठ नागरिक शालेय विद्यार्थ्यांना महामार्गावरील अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

     शहरांमधील स्टेट ऑफ बँक इंडिया आणि जनता सहकारी बँक राष्ट्रीय महामार्ग लगत औद्योगिक वसाहती जवळ गेल्याने शहरातील नागरिकांना असुरक्षित वाटत आहे त्यामध्ये नव्याने राष्ट्रीय महामार्गाचा उड्डाणपूल झाल्याने वाहतूक पुलावरून सुरू होईल त्यामुळे दोन्ही बाजूचे साईट रस्ते राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांनी प्रथम बनवून द्यावे असे रहिवासी प्रवासांचे म्हणणे आहे. मुरबाड नगरपंचायतीचे 17 प्रभाग आहेत मोठी औद्योगिक वसाहत आहे एमआयडीसी मध्ये मोठे कंटेनर वाहने मालाची वाहतूक करतात त्यांच्यासाठी स्वतंत्र रस्ता गरजेचे आहे तीन हात नाक्यावर सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग नगरपंचायत एमआयडीसी अशा चार-पाच विभागाचा निधी खर्च करून ४० फुटाचा तिरंगा ध्वज उभारला आहे. परंतु गेली 10 वर्ष लोटून गेली असताना शहापूर मुरबाड कर्जत रस्त्याचे काम भालूक फाट्यापासून शहरातील कुणबी समाज हॉल पर्यंत बनवले नाही.

     एकाच रस्त्यावर विविध शासकीय विभागाचा कोटी रुपये निधी खर्च झाला मात्र रस्त्याचे काम झालेले नाही त्याचा फटका वाहन चालकांना बसतो अपघात घडतात याकडे शासनाने लक्ष वेदावे अशी मागणी मुरबाड शहरवासीयांची आहे. मुरबाड धानिवली पुलापासून मुरबाडच्या ओरिएंटल कंपनीपर्यंत उड्डाणपूल बांधण्यात यावा देवगाव बदलापूर फाटा धानिवली यांना साईट रस्ता तयार करून मुरबाड शहरात जाणाऱ्या पर्यायी रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग जोडण्यात यावे अशी मागणी शहरवासीयांची आहे. मुरबाड माळशेज घाट कल्याण रस्त्याला माजी महसूल मंत्री यांचं नाव द्यावं अशा मागण्या गेली 20 वर्ष येतील खासदार आमदार करत आहेत प्रत्येक निवडणुकीत कै. शांताराम भाऊ घोलप यांचे नाव राष्ट्रीय महामार्गाला दिलं जाईल अशा आश्वासनाच्या गप्पा मारल्या परंतु त्यांचं नाव अद्याप माळशेज घाट कल्याण महामार्गाला कायदेशीर दिलेले नाही. 

    मुरबाड कल्याण माळशेज घाट चौपदरीकरण कांबा म्हारळ पासून रायता येथे वडोदरा समृद्धी महामार्गाला लागून येत आहे मुरबाड पर्यंत रस्ता बनवला जात असून मुरबाड शहरात भव्य उड्डाणपूल बांधण्याचे काम जलद गतीने सुरू आहे त्या पुलाला तसेच कल्याण मुरबाड माळशेज घाट राष्ट्रीय महामार्गाला कैलासवासी शांताराम घोलप राष्ट्रीय महामार्ग असं नाव द्यावं अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे मुरबाड एसटी डेपो चे नूतनीकरण करून शहरातील प्रमख गटाराचे जाणार पाणी विद्यानगर मध्ये दरवर्षी साचणार पुराचे पाणी म्हसा रोड वरच्या प्रमुख गटाराचे पाणी एमआयडीसी मधील 30 फूट नाला सुशोभित करून राष्ट्रीय महामार्गाने पूल उभाराव पर्यायी रस्ते बनवून द्यावे अशी मुरबाडच्या नागरिकांची मागणी आहे.

No comments