web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड तालुक्यात नवीन ''तारा'' गुटख्याचा उच्चांक;स्कुटी गाडीवर होतोय गुटखा विक्री यंत्रणा अपयशी

रोहित शिंदे / कल्याण :  मुरबाड तालुक्यासह शहरात मागील वर्षी प्रतिबंधीत विमल हा गुटखा जास्त प्रमाणात विक्री होत होता त्यावर स्थानिक यंत्रणेचे लागेबंध असल्याने हा गुटखा जोमाने विक्री होत असल्याने किन्हवली येथील पोलिस पथकाने मुरबाड मध्ये धाड टाकून येथील प्रतिबंधित गुटखा पकडला होता.त्यानतंर आज मार्केट मध्ये नवीन गुटख्याचा उगम झाला आहे.

‘’तारा गुटखा’’ हा गुटखा सध्या मुरबाडच्या गल्ली बोलात प्रत्येक टपरीमध्ये पहाण्यास मिळत असून याकडे यंत्रणेचे का कानडोळा होत आहे की हप्तेबाजीने हा तारा गुटखा डिलींग होत आहे. असा सवाल येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.प्रतिबंधित गुटखा असून हा तारा गुटखा किंग कोण? याला कोणाचा वरदहस्त आहे त्याला कोण पाठीशी घालत आहे याचा बोध मात्र गुलदस्त्यात आहे.

सदरील गुप्तचार यंत्रणा ही सुई पडल्यापासुन ते दहशतवाद अशा वर बारकाईने लक्ष ठेवून असते मात्र त्यांना ‘’तारा गुटखा’’या प्रतिबंधित गुटखा किंग डिलर यांचा शोध का लागत नाही हे मात्र एक प्रश्‍न चिंन्ह आहे. मात्र याकडे आता  अंमली पदार्थ विरोधी पथकांने लक्ष वेधावे अशी मागणी होत आहे.

  राज्यात बंदी असली तरी मुरबाड शहरात छुपेपणाने पान मसल गुटखा विक्री सरास सुरु असून हा गुटखा चक्क स्कुटीवरुन विक्री होत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत असून मुरबाड शहरात किराणा दुकानापासून टपरी पर्यंत गुटखा हा स्कुटी या दोन चाकी गाडीमार्फत मोठया प्रमाणात विक्री होत आहे.याच मुरबाड शहरात मागील 5 ते 6 वर्षापुर्वी एका गुटखा किंगवर धाड टाकली होती.तेव्हा साधारण 2 ते 5 लाखाच्या आसपास प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात किन्हवली पोलिसांना यश आले होते मात्र स्थानिक पोलिस यंत्रणेवर नागरिकांनी शंका व्यक्त केली होती.

  सदरील गुटखा विक्री सह दारु विक्री ही ट्राय डे ला स्कुटी वरुन विक्री होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मात्र या स्कुटी गुटखा दारु तस्करीला यंत्रणा का पाठबळ देते हे मात्र गुलदस्त्यात आहे.मुरबाड म्हसा चौक येथील एका किराणा दुकानातून हा गुटखा संपुर्ण तालुक्यात सुध्दा पोहचतो अशा चर्चा आता होऊ लागल्या आहेत.मात्र या स्कुटी गुटखा तस्करीचे लवकरच फोटो व्हिडीओ व्हायरल होतील त्यावर यंत्रणा काय कारवार्इ करणार हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.

No comments