अखेर १० वर्षांनी मुरबाड ते नांदगाव रस्त्यावर एसटी धावली..!
मुरबाड : मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नांनी मुरबाड ते नांदगाव एस्टी सेवा आज पासून सुरू झाली असून मुरबाड बस आगारात आ. कथोरे यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.ठाणे जिल्हा व रायगड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असनाऱ्या नांदगाव बलीवरे या गावांना जाण्या साठी मुरबाड बस आगारातून १० वर्षा नंतर या मार्गावर आज एस्टी धावली.
मुरबाड ते म्हसा- चिरड - आगाशी - झुगरेवाडी - बलीवरे - नांदगाव अशी बससेवा सुरू करण्या बाबत विद्यार्थी, नोकरदार आणि प्रवाशांची गेल्या अनेक वर्षा पासून मागणी होती. या अनुषंगाने आमदार किसन कथोरे यांनी पाठपुरावा करून प्रवाश्यांच्या सोई साठी आज पासून या बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. याच प्रमाणे आ.किसन कथोरे यांच्या प्रयत्नांनी मुरबाड लेणाड मार्गे शहापुर , मुरबाड ते कीसल मार्गे सायले, वैशाखरे झाडघर मार्गे चासोळे अशा नवीन बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असून मानवविकास कार्यक्रमा अंतर्गत ७४ फेऱ्या सुरू करण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख योगेश मुसळे यांनी सांगितले.



No comments