web-banner-lshep2024

Breaking News

शहापूरला पावसाने झोडपलं, पूरसदृश परिस्थितीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला


शहापूर  : शहापूर आणि आजूबाजूच्या परिसराला पावसाने झोडपलं आहे. रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहापूरमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. सततच्या पावसामुळे भारंगी नदीला पूर आला असून या पुराचे पाणी शहापूर शहरात शिरलं आहे. त्यामुळे शहापूर शहरील अनेक इमारतींमधील पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं आहे. इमारतींमधील अनेक वाहन पाण्याखाली आले आहेत. तर काही वाहने पाण्यात वाहून गेली आहेत. रस्त्यांना नदीचे स्वरूप आलं आहे. पहिल्याच पावसात संपूर्ण शहापुर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसाने काही साकाव पुराच्या पाण्याखाली गेल्याने अनेक आदिवासी वाड्यांचे संपर्क तुटले आहेत. वाशिंद परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्यामुळे  नागरिक घरात अडकून पडले होते. वाशिंद परिसरातील सृष्टी फार्म हाऊसमध्ये देखील पाणी साचलं. याठिकाणी फिरायला आलेले जवळपास 150 लोक येथे अडकले होते. एनडीआरएफचे पथकाने सर्व पर्यटकांना फार्म हाऊसमधून बाहेर काढलं.

खडवली नदीला पूर

टिटवाळ्यात मुसळधार पावसामुळे खडवली नदीला पूर आला आहे. खडवलीचा फळेगाव रुंदे मुख्य पूल पाण्याखाली गेल्याने पाच ते सहा गावाचा संपर्क तुटला आहे.

 

No comments