बारवी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल नदीकाठ्यांच्या गावांना सतर्क राहण्याच्या बारावी धरण विभाग अधिकाऱ्यांच्या सूचना...!
नामदेव शेलार / मुरबाड : बारवी धरणाच्या जल क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे सततच्या पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी 67:70 मी एवढी झाली आहे. त्यामुळे बारावी धरणाची पाणी पातळी वाढून धरणाचे स्वयंचलित वक्रद्वारे गेट येणाऱ्या काही दिवसात उघडण्याची शक्यता आहे परिणाम स्वरूप बारवी धरणातून बारवी नदी पाण्याचा विसर्ग सुरू होईल असे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता दशांत उईके यांनी लेखी पत्राद्वारे कळविले आहे.
नदीकाठीच्या असनोळी,चांदप,चांदपाडा,पिंपळोली, सागाव,पाटीलपाडा, पादिरपाडा ,कारंद मोऱ्याचापाडा, चोन, राहटोळी व नदीकाठी वरील शहरे तसेच शहरातील शासकीय यंत्रणा सरपंच पोलीस पाटील तलाठी ग्रामसेवक यांनी गावातील नागरिकांना व पर्यटकांना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याबद्दल सतरतेच्या सूचना देण्याचे कळविले आहे बारावी धरणाचा पाणी सोडण्या अगोदरच रायता पूल पाण्याखाली गेला आहे बारावीचे पाणी सोडल्यावर पुन्हा रायता नदीवरील पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच बारावी धरणाच्या पाणी सोडल्यावर रायता आने भिसोल परिसरातील गावांना पूर परिस्थितीला सामोरे जावे लागते परंतु अधिकाऱ्यांनी त्या गावांना सतर्कतेच्या सूचना लेखी पत्रात केलेल्या नाहीत बावी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यावर मुरबाड मधील धरणालगतची गावे पाडेवाड्याना पुराच्या पाण्याचा फटका बसत असतो मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान होते त्यामुळे शेतकरी गावकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून आपत्कालीन यंत्रणा शासनाने सज्ज ठेवावी अशी मागणी होत आहे.



No comments