मुरबाड शहरात मटका गल्लो गल्ली....
रोहित शिंदे / कल्याण : ठाणे जिल्हयात अवैध ऑनलाईन लॉटरी सह मटका कोरोबार जास्त प्रमाणात वाढत चालला आहे.याच मटका लॉटरी मुळे युवा पीढी बर्बाद होत चालली असुन शासन प्रशासन यांनी मौन धरले आहे.
मुरबाड शहरात ऑनलाईन लॉटरी तर गल्लो गल्ली मटका हा अवैध धंदयाला पेव फुटले आहे.मुरबाड शहरात पोलिस स्टेशनच्या परिसरात देवीची आळी सह अन्य गल्ली बोल्लात मटका जोमात असुन त्यावर यंत्रणा का कारवाई करत नाही हे मात्र गुलदस्त्यात आहे.
तसेच ऑनलाईन लॉटरी माफीयानी लॉटरीचे आपल्यानिजी सॉफ्टवेअर बनवले असल्याचे सुत्रांकडुन माहिती मिळत असून हया सॉफ्टवेअरचा उपयोग करुन जनताकडून लाखोची लॉटरीच्या नावाखाली लुट करत असल्याचे बोलले जात आहे.



No comments