web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडकरांचे चाऱ्या बाजूने रस्ते बंद विद्यानगर मधील पुराचे पाणी मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्या टीमने जेसीबीच्या साह्याने काढले

नामदेव शेलार / मुरबाड : सतत तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुरबाड तालुक्यात छोटे छोटे पूल साकव पाण्याखाली जाऊन शेकडो गावांचा शहरी करणाशी संपर्क तुटला मुरबाड कल्याण प्रमुख रस्त्यालगत असणाऱ्या मुरबाड नगरपंचायतीच्या हद्दीतील विद्यानगर मध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती वाहने पाण्याखाली जाऊन घरात पाणी शिरले होते पहाटे घटनास्थळी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी घेऊन जेसीपी मशीनच्या साह्याने तुंबलेला पाणी प्रमुख नाला खोदाई करून पूर परिस्थितीवर मात करून रहिवाशांना दिलासा दिला.

     नगरपालिकेचे अधिकारी देशपांडे,देवकर,दत्ता डोहळे संदीप तेलवणे,जगन जाधव,माळी अन्य कर्मचारी कामगारांनी शहरातील विद्यानगर,नागाचा खडक,मुरबाड शहरातील पुराचे पाणी काढण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली आणि शहरातील बंद होणारे रस्ते खुले केले. विद्यानगर मध्ये दरवर्षी पुरहाणी होते तेथील पाणी मुरबाडी नदीत घालवण्यासाठी गटार खोदण्यात आली आहे परंतु विद्यानगर कल्याण मुरबाड माळशेज घाट रस्त्यालगत गटारीचे निकृष्ट केलेले काम उभ्या राहत असलेल्या इमारतींची बांधकामे यांच्यामुळे यंदाही विद्यानगरला पूर परिस्थितीला सामोरे जावे लागले मुरबाड म्हसा रोड वरील प्रमुख नाल्याचा पाणी रोडवर आले होते म्हसा रोड शेळके पाडा मुरबाड शहर विद्यानगरचा येणारा पाणी एमएससीबीच्या कार्यालयालगत असणाऱ्या तीस फूट नाल्यातून मुरबाडी नदीपात्रात जात होते मात्र त्या नाल्यालगत अवैद्य बांधकामे एमआयडीसी कंपन्या प्लॉट धारकांनी भराव टाकून केल्याने पुराचे पाणी जाण्यास अडथळा निर्माण होत आहे.

      एमआयडीसी मधून जाणाऱ्या नाल्यांची रुंदीकरण करून अवैध बांधकामे तात्काळ हटवावी संरक्षण भिंती तोडण्यात याव्यात गटारीवर केलेली बांधकामे निष्कासीत करावी अशी मुरबाडकरांची मागणी आहे. मुरबाड कल्याण कडे जाणाऱ्या किशोर गावाजवळ नदीचे पाणी रस्त्यावर आल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे मुरबाड,कल्याण, टिटवाळा, बदलापूर कडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. किशोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्णतः पुराच्या पाण्यात बुडाले होते कल्याण मुरबाड रस्त्यावरील रायता पूल पाण्याखाली गेल्याने कल्याण,मुरबाड,आळेफाटा,नगर, ओतूर, जुन्नर, टिटवाळा,मुंबईकडे जाणारी येणारी वाहतूक कोळंबली त्याचा फटका प्रवाशांना बसला.

No comments