web-banner-lshep2024

Breaking News

अतिवृष्टी शेती नुकसान आपत्कालीन यंत्रणा सज्ज मुरबाड तहसीलदारांचे संबंधित शासकीय यंत्रणांना सूचना आरोग्याची काळजी घेण्याचे नागरिकांना अहवान...!

नामदेव शेलार / मुरबाड : गेले महिने भरात मुसळधार पाऊस पडल्याने मुरबाड तालुक्यातील अनेक ठिकाणी अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे रस्ते खराब होऊन पर्यटन स्थळी अपघाताची दुर्घटना घडू नये यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी सज्ज रहावे अशा सूचना मुरबाडचे तहसीलदार संदीप आवारी यांनी केले आहे. अतिवृष्टीने जिथे शेती दुकाने घरे यांचा नुकसान झाला आहे त्यांचे पंचनामे करून सादर करण्याचे आदेश दिले आहेत मुरबाड कल्याण माळशेज घाट रस्त्याची दुर्दशा झाल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहेत.

       रुग्णांना उल्हासनगर,कल्याण,ठाणे, मुंबईला घेऊन जाताना त्रास सहन करावा लागतो अशा रस्त्याची डागजुगी तात्काळ करून रस्ते अपघाताचा प्रमाण कमी करण्यावर भर द्यावे असे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना सांगून माळशेज घाट बारवी धरण नाणेघाट सिद्धगड गोरखगड पर्यटनावर जाणाऱ्या पर्यटकांना ट्रॅकर यांना आळा घालावा अशा सूचना पोलिसांना केल्याचे तहसीलदार संदीप आवारी यांनी सांगितले. मुरबाड तालुक्यात आपत्कालीन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचवण्यासाठी महसूल विभागाकडून सतर्कता बाळगली जात आहे 

     बारवी डॅम ची उंची वाढ झाल्यापासून धरणाच्या लगतच्या गावे पाडे येथील शेतीवरील रस्ते प्रवाह बंद होतय अशा पूर हानी जागेवर महसूल कर्मचारी लक्ष ठेवून आहेत मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी छोटे छोटे रस्ते बंद होतात नदी धरण बंधाऱ्यांच्या लगत राहणाऱ्या नागरिकांनी सावधगिरी बाळगावी नदी नाले धबधबे डॅम धरणात कोणीही पोहण्यासाठी जाऊ नये असे आवाहन तहसीलदार संदीप आवारी यांनी नागरिक पर्यटकांना केले आहे. डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे अहवाल करून आरोग्य यंत्रणांना सज्ज राहण्याचे सुचित केले आहे कल्याण मुरबाड माळशेज घाट रस्त्यावर ॲम्बुलन्स सेवा अपघाताच्या ठिकाणी कार्यरत करावी माळशेज घाटात दरडी कोसळणाऱ्या ठिकाणी जेसीबी सुरक्षा यंत्रणा कार्यविणीत करण्याचे आदेश तहसीलदार संदीप आवारी यांनी संबंधित विभागांना दिले आहे.

No comments