web-banner-lshep2024

Breaking News

देशाच्या गृहमंत्र्यांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याच काम - महेश तपासेंचा हल्लाबोल

मुंबई  : शरद पवार  यांनी भ्रष्टाचार वाढवला असे केंद्रीय गृहमंत्री   अमित शहा यांनी म्हणणे, हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयार केलेला भाजप पुरस्कृत एक नवा फेक नरेटिव्ह आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश  तपासे यांनी लगावला.भाजपच्या पुण्यातील कार्यकर्ता  बैठकीमध्ये  शहा यांनी  पवार  यांच्यावर केलेली वक्तव्य देशाच्या गृहमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला शोभत नाही. अशी टीका करीत अमित शाह यांच्या  वक्तव्याचा तपासे यांनी  निषेध केला 

महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला गेला असे वक्तव्य गृहमंत्री  अमित शहा यांनी केले होते.मुळात फेक नरेटिव्ह भाजपच्या नेत्यांकडूनच केला जातो असा प्रति दावा तपासे यांनी केला.पवार यांच्यावर  भ्रष्टाचाराचे खोटे आरोप भाजपने राजकीय फायद्यासाठी नेहमीच केले. सामान्य शेतकरी माणसाचं कष्ट कमी करण्यासाठी पवार यांनी  कृषी मंत्री असताना केलेल्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्कार दिल्याची आठवण तपासे यांनी अमित शहा यांना करून दिली.

पुढे महेश तपासे म्हणाले की, राज्यातील आरक्षणाविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने यापूर्वीच करण्यात आली होती. आरक्षणाची मर्यादा ५०% पेक्षा जास्त वाढवण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती मात्र केंद्रातील भाजप सरकार आरक्षणाच्या मुद्दा गांभीर्याने घेत नाही आहे व कायदेशीर रित्या आरक्षणाची मर्यादा वाढवीत नाही असे देखील महेश तपासे म्हणाले.

महेश तपासे म्हणाले की, भाजपच्या कार्यकर्त्या बैठकीमध्ये  राज्याचे गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्याप्रमाणे ठोकून काढा अशा भाषेचा उपयोग केला त्याचा नेमका अर्थ काय समजायचा हे त्यांनी स्पष्ट करावे. आम्ही भाजपला वाढलेल्या महागाईचे कारण, वाढलेल्या बेरोजगारीचे कारण, वाढलेल्या भ्रष्टाचाराचे कारण विचारणे हा फेक नरेटीव होऊ शकत नाही. जनतेला भेडसवणाऱ्या ह्या प्रमुख प्रश्नांना फेक नॅरेटिव्ह ठरवणे हे खरंतर भाजपचं अपयश आहे असा टोला महेश तपासे यांनी लगावला.आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी निवडून येणार असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला.

No comments