web-banner-lshep2024

Breaking News

रेनबो सनराइस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव साजरा

मुरबाड  : मुरबाड तालुक्यातील नामवंत असलेले एकमेव आयएसओ नामांकित रेनबो सनराइस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तीन वर्षांपासूनचे ते दहावीपर्यंत विद्यार्थी विद्यार्थिनींनी टाळकी वाटकी वेशभुषेत सहभाग नोंदवून पारंपारिक उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला. यावेळी या शाळेमध्ये छोटे वाटकरी, टाळकरी यांनी खांद्यावर पालखी घेऊन भक्तीगीते गावून वाजत गाजत नाचत हा उत्सव दणकेबाज व शानदार पद्धतीत साजरा केला. या बहरदार उत्सवामध्ये एका विद्यार्थ्याने हुबेहूब श्रीविठ्ठलाची वेशभूषा साकारली तर एका विद्यार्थिनींनी रुक्मिणीची वेशभूषा साकारली. या उत्सव कार्यक्रमात टाळ, भजन, किर्तन अशा रूपरेषात हा आनंद उत्सव साजरा केला.

       यावेळी रेनबो सनटाईस इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक तथा मुख्याध्यापक पंढरीनाथ टोले सर यांनी सदर उत्सवाचे नियोजन आखून विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय संस्कृती निर्माण केली. संस्कृती हा आपल्या जीवनाचा आरसा असून ते जपणे आपले कर्तव्य आहे. आपण ही संस्कृती जपतो याचा स्वाभिमान आणि अभिमान आपण बाळगलाच पाहिजे अशी विचारधारा यावेळी मुख्याध्यापक टोले सरांनी आपले विचार मनोगतात मांडले. या उत्सवाला सर्व शिक्षक, कर्मचारी, स्टाफ, शिपाई यांचा सहभाग असल्याचे यावेळी दिसून आले. यावेळी मोठ्या थाटामाटात हा पारंपारीक उत्सव साजरा करण्यात आला.

 

 

No comments