सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शेकडो कोटीचा निधी खर्च रस्ते मात्र कागदावरच गरोदर महिलेला रस्त्या अभावी डोलीतून नेले रुग्णालयात...!
नामदेव शेलार / मुरबाड : शेकडो कोटीचा निधी मुरबाड विधानसभा मतदारसंघात खर्च करण्यात आला असताना आदिवासी वाड्यांना अद्याप रस्ते उपलब्ध झालेले नाहीत सार्वजनिक बांधकाम उपविभाग अधिकाऱ्यांनी दरवर्षी शेकडो कोटी रुपयांची कामे ठेकेदारांच्या नावे दाखवून शासनाचा निधी खर्च केला परंतु रस्ते कागदावरच राहिल्याने मुरबाड ओजीवले येथील आदिवासी वाडीला स्वातंत्र्याच्या 75 वर्षातही अद्याप रस्ता नाही. ओजीवले आदिवासी वाडी मधील एका गरोदर महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिला रस्ता नसल्याने कोणतेही वाहन ॲम्बुलन्स घेण्यासाठी पोहोचू शकली नाही त्या गरोदर महिलेला चक्क गावातील माणसांनी चादरीची डोळी करून रुग्णालयात नेल्याने तिच्यावर आलेला संकट टळला आहे.
ठाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागांमधील मुरबाड तालुका येथे दरीखोऱ्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वस्ती आहे 54 ग्रामपंचायतीचे आदिवासी सरपंच असून 21 गावे पेसा कायदा अंतर्गत येतात तेथे राष्ट्रपती आले होते त्याच ठाणे जिल्ह्याचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या शेकडो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराला भाजपा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी अशा सर्वांच्या सरकारमध्ये प्रोत्साहन मिळाल्याने मुरबाडचा दुर्बल आदिवासी भाग आजही रस्ते पाणी आरोग्य रोजगारापासून दुर्लक्षित आहे. सर्व सत्ताधारी विरोधक पुढार्यांचे ठेकेदार असल्याने अधिकाऱ्यांना नेहमीच बळ मिळते मुरबाडला रोजगाराचे साधन नसले तरी राजकीय कार्यकर्ते पुढाऱ्यांना लोकप्रतिनिधी रस्ते इमारती पूल साकव गटारी सौचालय संरक्षण भिंती पेव्हर ब्लॉक पाणीपुरवठा योजना पासून सर्वच ठेकेदारीच्या कामाचा वाटप करून सरपंच सदस्य नगरसेवक पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांसह सर्वांना ठेकेदारीचा रोजगार मिळतो त्यामधूनच राजकीय पक्षांची वाढ झाली परंतु ग्रामीण रुग्णालय रस्ते संरक्षण भिंती गटारी सौचालय शाळा माळशेज घाट अशा अनेक कामे प्रवासी नागरिकांचे जीवघेणा बनली आहेत.
हिवाळी उन्हाळी विधानसभा अधिवेशनात मंजूर झालेला कामावरील निधीची कामे सुरू झालेली नसताना पावसाळी अधिवेशनात त्याच कामासाठी निधी मंजूर होत असल्याने विकासाच्या नावाखाली समस्यांची डोळी जीव घेणे बनली आहे. मुरबाड तालुक्यामध्ये 214 महसुली गावे आहेत 127 ग्रामपंचायती यामध्ये सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे चार रस्ते होते यापुढे त्यांना रस्ते नसल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद राष्ट्रीय महामार्ग मुरबाड नगरपंचायतीच्या जागेवर शेकडो कोटीची कामे केल्याचे दाखवून शासनाचा निधी खर्च केला त्यात ठेकेदारांना रोजगाराचे साधन मिळाले परंतु आजही मुरबाड तालुक्यामधील रस्त्यांची दुरावस्था जशाची तशीच आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आदिवासी डोंगरी जिल्हा नियोजन कोकण विकास आमदार खासदार अशा अनेक हेडमध्ये शासनाचा निधी विस्तारून कामावर खर्च केला जातो कामे मात्र तीच असतात शिवाय जिल्हा परिषद बांधकाम ग्रामपंचायत यांची कामे सुद्धा त्याच रस्त्यावर असल्याने शासनाचा शेकडो कोटीच्या निधीने पांढरपेशी पुढारी ठेकेदार व्यवसाय जोमात आहे. मुरबाड विधानसभा मतदारसंघात ठेकेदारापेक्षा अधिक बळकट कोणी नाही सर्व राजकीय पक्षात विभागले जाणारे ठेकेदार पदाधिकारी लोकप्रतिनिधी म्हणून सामान्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अधिकाऱ्यांशी संगणमत करून आदिवासी गोरगरिबांचे रस्ते पाणी योजना एसटी प्रवास सेवा रुग्णालय (आरोग्य) रोजगार समस्या गंभीर बनल्या आहेत. सरकार मंत्री लोकप्रतिनिधी यांचं याकडे नियमित दुर्लक्ष करून मतांच्या लाचारीचे राजकारण दरवर्षी विविध अपघात घटनांमध्ये शेकडोंचा बळी घेत आहे. शासनाच्या गुण नियंत्रण विभाग व्हिजिलन्स शाखा अभियंता उपअभियंता कार्यकारी अभियंता प्रत्यक्ष दर्शनी कोणत्याही रस्ते इमारती कामावर हजर नसल्याचा फायदा ठेकेदार टक्केवारी देऊन घेतो शासनाला खोटे अहवाल पाठवून दरवर्षी मुरबाडला मंजूर होणाऱ्या शासकीय निधी खर्च कुठे झाला आहे त्याची चौकशी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कोटी रुपये दरवर्षी कागदपत्रे खर्च होतात किंवा प्रत्यक्षात अशा तक्रारींना सरकार आणि अधिकारी प्राधान्य देत नाहीत परंतु आदिवासी गोरगरिबांना रस्ते साकव रुग्णालय सेवा स्वच्छ पाणी दिले पाहिजे
..... निलेश जोशी
--------------------------------------------------------------------------------------------------------------लोकप्रतिनिधी कामाचे वाटप करतात त्यांची कामे पूर्ण करून घेण्याचा काम आम्ही करतो मात्र कामांची बिले कार्यकारी अभियंता ठाणे यांच्याकडे निघतात त्यावर अधिक बोलणं टाळलं.
......उपाभियंता पतंगीराव, मुरबाड



No comments