MURBAD NEWS | मुरबाड पोलिसांकडून नव्या फौजदारी कायद्याची सर्वतोपरी जनजागृती..!
मुरबाड : केंद्र शासनानी नवीन तीन कायदयाची घोषणा केली असून सदर तीन कायद्दयाची काल दि. 01 जुलै 2024 पासून अंमलबजावणी करण्यात आले असता मुरबाड पोलीस ठाण्याचे धडाडीचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी स्वतः आपली उपस्थिती दर्शवून स्थानिक पातळीवर सदर कायद्दयांबाबत मोठया प्रमाणात जनजागृती मुरबाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेले न्यु इंग्लिश स्कूल व स्वामी विवेकानंद विद्दयालय येथे प्रत्यक्ष भेट देऊन शिक्षक व विद्दयार्थ्यांसोबत भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरीक सुरक्षा, भारतीय साक्ष अधिनियम या कायदयासुरक्षावर कार्यक्रमाचे आयोजन करून चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
यावेळी थोडक्यात या तीन्ही कायद्दयासंदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद बाबर यांनी मार्गदर्शन केले. तसेच लहान मुले व महिलांविरुध्दाचे गुन्हे याबाबत माहिती देत जनजागृती कटित मुरबाड मधील सोनारपाडा, देवगांव, घुटयाचीवाडी, व परिसरातील सर्व रिक्षाचालक/मालक यांची तीन हात नाका चौकी येथे एकत्रित मिटींग घेऊन नवीन कायद्दयांसंदर्भात माहिती देऊन योग्य मार्गदर्शन केले त्याचबरोबर विविध गावातील प्रतिष्ठीत नागरिक, शांतता कमिटी, एमआयडीसीतील कंपनी कर्मचारी, व्यावसायीक, तरुण युवक व इतर ग्रामस्थ यांची मिटींग घेऊन या नवीन 3 कायद्दयांविषयी स्थानिक पातळीवर प्रसध्दिी व जनजागृती करून मोलाचे जनजागृती करण्यात आले.
यावेळी वपोनी. बाबर यांनी या जनजागृतीची सुरुवात अंमलबाजवणी तारखेच्या पहिल्याच दिवशी केल्याने प्रत्येक नागरिकांपर्यंत सदरच्या नवीन कायदयाची माहिती पाहोचविल्याने सर्व शिक्षक, व्यवसायिक कर्मचारी, नवयुवक, महिला भगिनी, प्रतिष्ठित, ज्येष्ठ नागरिकांसह ग्रामस्थ मंडळीनी त्यांचे व सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले आहे.


No comments