web-banner-lshep2024

Breaking News

पाऊस पडताच खवय्यांची पसंती शेवळी मुठे मासे कडे वळली

नामदेव शेलार / मुरबाड: पहिला पाऊस पडताच बाजारात शाकाहारी भाजी शेवळी खरेदी करण्यासाठी खवय्यांची लगबग सुरू झाली आहे दरवर्षी जंगलातून मिळणारी शाकाहारी भाजी शेवळीला नागरिकांची मोठी पसंती मिळते मटणापेक्षा उत्तम स्वाद असल्याने अनेक शाकाहारी लोक शेवळी खरेदी करून त्याचे तुकडे करून उन्हात वाळवून ठेवतात त्याचा उपयोग संपूर्ण श्रावण महिन्यात करतात शेवळी भाजीच्या जुड्यांना प्रचंड किंमत असते.

         मुरबाड तालुक्याशी डोंगराळ भाग जोडला गेला असल्यामुळे येथे रानभाज्याची आवक भरपूर असते दरवर्षीप्रमाणे खवय्यांची सर्व शहरातील रस्त्यावरील बाजारपेठा हाऊसफुल झाले आहेत पावसाळा सुरू झाल्यावर पडलेला पाऊस नदी बंधाऱ्यात मिळतो त्यावेळी वर्षभर एकाच ठिकाणी असणारे मासे वळगण सोडण्यासाठी उथळ पाण्याकडे पळतात नदी बंधाऱ्याच्या किनाऱ्याला मासे रात्रीच्या वेळी येतात त्यांना पकडण्यासाठी खवय्यांची गर्दी होऊ लागली आहे पागेरा भुसा गळ टाकून मासेमारी केली जाते.

                      मासेमारीसाठी मुरबाड सरळगाव धसई पडघा अन्य ठिकाणी पागेरे विक्रीला आले आहेत दरवर्षी त्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे पावसाळा सुरू झाल्यावर समुद्राची मच्छी बंद राहते त्याच कालावधीत ग्रामीण भागात मच्छीमारीचा उत्साह सुरू असतो शेतात मासे पकडण्यासाठी पावसाळ्यात हजारो नागरिक जत्रेप्रमाणे जमतात नुकत्याच पावसाने सुरुवात केली आहे येत्या आठ दिवसांनी संपूर्ण बाजारपेठ मूठे चिंबोरीने भरलेल्या दिसतील पाऊस पडल्यावर मुठ्यांचे हवेचे थवे बिळातून बाहेर येतात.

             त्यांना पकडण्यासाठी पेटत्या मशाली दिवे गॅस बत्ती घेऊन लोक रात्रीच्या वेळी बाहेर पडतात पावसाळा सुरू झाल्यापासून गटारी अमावस्या पर्यंत मुठे चिंबोरी मासे खवय्यांनी बाजारपेठा पूर्णतः गर्दीमुळे असतात त्यांची सुरुवात झाली आहे सुका बंदराच्या किमती वाढल्या आहेत त्यामुळे बंदर खरेदीवर परिणाम झाला आहे पावसाळ्यात लहान मोठे मासे मारून त्यांचे तुकडे वाळवून सहा महिने वापरले जातात अशा रानभाज्या गावठी मच्छीचा व्यवसाय ग्रामीण भागातील गोरगरिबांना रोजगार देत आहे येत्या जून जुलै महिन्यात मच्छीमारीला सुगीचे दिवस येणार आहेत तसेच शेवळी माठ भोपर चवळी भाजी कंटोळी या भाज्या हळूहळू बाजारात येऊ लागले आहेत.

 

No comments