web-banner-lshep2024

Breaking News

माळशेज घाटात एसटी व दुचाकी मध्ये भिषण अपघात २ जण जागीच ठार..!

मुरबाड : नुकताच मुरबाड तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र मुरबाड- माळशेजघाट - नगर घाटरस्त्यावरील अपघातांची मालिका कायम आहे. माळशेजघाटात चालत्या रिक्षावर दरड कोसळून दोन जणांचा बळी जाण्याची घटणा ताजी असताना आज (गुरुवारी ) पुन्हा माळशेज घाटात एसटी व दुचाकीचा भिषण अपघात होऊन दुचाकीवरील दोघां जणांचा जीव गेल्याची घटना घडली असून या प्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आज गुरुवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास कल्याण हून तारकपुर कडे प्रवासी घेऊन जाणारी परिवहन महामंडळाची एसटी बस क्रमांक MH.14. K A 9845 ही माळशेज घाटातून जात असताना माळशेज नगर महामार्गा वरील घाटातील नाणेघाट रस्त्या जवळील रस्त्यावर मुंबई कल्याण मुरबाड हून माळशेजघाट मार्गे नगर कडे जाणाऱ्या आग्रिपाडा सांताक्रूझ मुंबई येथील २२ वर्षीय रोहीत रमेश डिंगणकर व २० वर्षीय नंदिनी मयांगडे या दुचाकी क्रमांक  MH 02 PF 4746 वरून जात असताना एसटी व दुचाकी मध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली या मध्ये दुचाकी वरील दोघां जणांना जबर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. एकंदरीत माळशेजघाट मृत्यूचा सापळा बनला असून प्रवासी या घाटरस्त्याच्या चौपदरीकरणा कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

No comments