मुलींना मोफत शिक्षण भाजपा ने केली फसवणूक विधानसभेला परिणाम
नामदेव शेलार / मुरबाड :भाजपाचे शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना वैद्यकीय लॉ इंजीनियरिंग सह अन्य शैक्षणिक कोर्स मध्ये मोफत शिक्षणाची घोषणा केली होती त्याचा जीआर अद्याप निघालेला नाही उच्च शिक्षण घेणाऱ्या लाखो मुली गरीब घरातील आहेत त्यांच्या पालकांनी मुलींचे भवितव्य उज्वल जाईल अशी अपेक्षा केली होती त्यांची अपेक्षा भंग झाल्याने येत्या विधानसभेला भाजपा वरील नाराजी वाढणार आहे मोदींची गॅरंटी खोटी ठरत असल्याची टीका देशाचे नेते शरदचंद्र पवार यांनी करून भाजपा आश्वासने देऊन लोकांची फसवणूक करतो यावर जन्मताचा विश्वास बसू लागला आहे.
उच्च शिक्षण घेणाऱ्या गोरगरिबांच्या मुलांना खाजगी कॉलेज विद्यापीठ मध्ये लाखो रुपये फी द्यावी लागते डोनेशन द्यावे लागते त्यासाठी पालक वर्ग कर्जबाजारी होत असून शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकऱ्या मिळत नसल्याने विद्यार्थी आत्महत्या कडे वळतात याचं गांभीर्य सरकारला नाही महाराष्ट्राचे सरकार खोटे आश्वासने देऊन मतांचे राजकारण करतात लोकसभा विधानसभा अन्य निवडणुका जिंकून सत्ता मिळवण्यासाठी अतुर असलेल्या भाजपाला पुढच्या काळात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात मंत्री राजकीय पुढाऱ्यांचे कॉलेज असल्याने तेथील लूटमार मनमानी कारभारावर कोणत्याही प्रकारे कारवाई केली जात नाही स्वतःच्या घराणेशाहीत आजचे राजकारण सत्ताधीश मालामाल होऊ लागल्याने महाराष्ट्रात गरिबाचा वाली कोणीही उरलेला नाही. महाराष्ट्रात शाळा कॉलेज वैद्यकीय इंजीनियरिंग लॉ कॉलेज यासह उच्चशिक्षित कॉलेज शासकीय नाहीत मोठ्या प्रमाणात खाजगी शाळा कॉलेज आहेत त्यांना शासन अनुदान आणि परवानगी देतात तेथे मनमानीने ट्युशन फी वस्तीगृह फी खानावळ मेसचे पैसे हजारो लाखो ने घेतात त्यांना शासनाच्या अधीन राहून खाजगी कॉलेज शाळा चालक मालकांची मनमानी थांबवावी अशी मागणी पालक वर्ग विद्यार्थ्यांची आहे.
प्रत्येक तालुका स्तरावर उच्चशिक्षित कॉलेज शासनाने काढावीत खाजगी कॉलेज शाळांना शासकीय कॉलेज प्रमाणे फी आकारणी करण्याचा आदेश काढावा अन्यथा त्यांना शासनाने परवानगी अनुदान देऊ नये अशी पालकांची मागणी आहे सर्व शाळा कॉलेजमधील मनमानी कारभाराची शासनाने चौकशी करावी अशी सुद्धा मागणी आता होत आहे.



No comments