web-banner-lshep2024

Breaking News

विधानसभा निवडणुकीत अदृश्य शक्ती पिंगळारूपी जनजागरण भूमिकेत राहणार मुरबाड विधानसभा मतदारसंघात दिग्गज उमेदवार


नामदेव शेलार / मुरबाड : नुकत्याच लोकसभा निवडणुका संपल्या त्यांचा धुराळा अद्याप संपला नाही तोच विधानसभा निवडणुका लागणार असल्याने मुरबाड विधानसभा मतदारसंघात आमदारकीसाठी दिग्गजांची तयारी सुरू आहे. भिवंडी लोकसभेतील भाजपाचा मंत्री दिग्गज नेत्यांचा गाजावाजा आणि सत्तेचा बँड बाजा असताना पराभूत झाला त्यामागे अदृश्य शक्ती असल्याची चर्चा रंगली होती तीच अदृश्य शक्ती विधानसभा निवडणुकीत पिंगळा रुपी जनजागरण करून जसाच्या तसं उत्तर देण्याची तयारी करणार असल्याची दाट शक्यता नाकारून चालणार नाही पिंगळ्याची ओवी सर्वांना नाचवते त्यामध्ये काहीही शब्दांचा नाच करता येतो पिंगळा बोलेना तुला पाडूच राहीन पिंगळा बोलेना ज्याचे होते दोन डोळे त्याचा एक फोडीला आता राहिलेला डोळा फुटलेलाच फोडेल अशी स्थिती निर्माण झाली आहे.

     राजकारणात काय होतंय कधी अल्टिमे पलटी आणि पलटी मे पलटी मारतील हे सांगण्याची गरज नाही तरीही इच्छाशक्ती दिग्गजांना प्रसन्नावली आहे मुरबाड विधानसभा मतदारसंघात सत्ताधाऱ्यांकडे सर्व जुने जाणते इच्छुक आणि दिग्गज उमेदवार आहेत एकीकालचे विधानसभेसाठी जीवाचा रान करून आमदारकीसाठी झगडणारे सत्तेत एकत्र आल्याने मुरबाड विधानसभा कोणाला? याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. विधानसभा विधान परिषद महामंडळावर वर्णी लागावी असे तीन नेते भाजपा शिंदे सेना अजित दादा राष्ट्रवादीकडे आहेत परंतु विरोधी पक्षाच्या आघाडीकडे हवा तसा दिग्गज नाही सत्तेतून एकदा पलीकडे इंडियात गेल्यास चांगली जुपेल मात्र अदृश्य शक्तीचा हात चळवळल्या शिवाय राहणार नाही धोक्याची घंटा बांधूनच बाबा फिरावं लागत हे सर्वांना माहीत आहे.

        त्यामुळे एकमेकांचे प्रतिस्पर्धी कोण असणार याला अधिक महत्त्व आहे गाफील राहून गुरुजींना कोणाची कुंडली मांडण्याचा प्रयत्न केल्यास ज्यांची कुंडली बनवतो आपण त्यांच्याच पानापानात दोष घुसून राहतो त्याचा फटका कधीही बसू शकतो याचा अनुभव लोकसभेत अनेकांना आला आहे. खरंतर मुरबाड लोकसभा आणि विधानसभेच्या नेतृत्वाने पहिले मुरबाड ची निर्भीड पत्रकारिता संपवण्याचा प्रयत्न केला साम दाम दंड भेद यापेक्षा जाहिराती बंद प्रशासनाला पाठीशी घालून भ्रष्टाचाराला अभय मुस्काड दाबी यापलीकडे जाऊन काही परिणाम निर्भीड तेवर होत नाही म्हणून डायरेक्ट करेक्ट कार्यक्रम नाही जमल्यावर बाहेरचे मानगुटीवर बसवून आपल्या कार्यकर्ते समर्थकांना संधी दिली त्याचा परिणाम जनमतात गेल्या 1995 पासून आज पर्यंत झालेला दिसत आहे.

       सामाजिक कार्यकर्ता निर्भीड पत्रकार लेखक सामान्य नागरिकांना बरोबर घेऊन त्यांच्यासोबत असणाऱ्यांना शासनाच्या योजना चा लाभ आणि विकास निधीचा काम कधी दिला नाही याचाही फटका नेहमी बसतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे. येत्या विधानसभा मतदारसंघात रागाचा मान कुठे जातो त्यामधून परतीचा दोर कोण कापतो वासुदेवाचा पिंगळा काय संदेश लोकांना देतो याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे लोक फार संतप्त आणि शांतही आहेत.

          त्यांच्याकडून परफेक्ट काम होतंय मात्र भलतेच करेक्टचा श्रेय घेतात ज्याला गावात कोणी भाव देत नाही त्याला मेकर म्हणतात खरा करेक्ट कार्यक्रम किंगमेकर बाबा आता अदृश्य शक्तीच्या हातात आहे पिंगळा भविष्य सांगत नाही. पिंगळा भविष्य सांगत नाही मात्र तुमच्यावर वाईट वेळ येणार आहे सावध रहा असा संदेश देतो असाच प्रकारे मुरबाड विधानसभासह अन्य विधानसभेत निवडणुकीचा जनजागरण राहणार आहे याचा फायदा घेण्यासाठी नव्या दमतीचे इच्छुक पुढे आले आहेत.

No comments