web-banner-lshep2024

Breaking News

नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून 3 जूनला डॉक्टर राजेंद्र विखे पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार


नामदेव शेलार / ठाणे,मुरबाड : देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची धामधुम सुरू असतानाच नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून तीन जूनला डॉक्टर राजेंद्र विखे पाटील हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत लाखो विद्यार्थ्यांना डॉक्टर,इंजिनिअर सह अन्य क्षेत्रात घडवणारे डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांच्या नेतृत्वाला नाशिक शिक्षक मतदार संघातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

           एक अभ्यासू जाणकर आणि गोरगरिबांचे कैवारी परिसरातील प्रत्येकाच्या समस्यांची जाण असणाऱ्या डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तीन जूनला सकाळी ग्रामदैवत श्री म्हसोबा महाराज दर्शन स्थळ म्हसोबा मंदिर लोणी येथून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दुपारी 1 वाजता विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक रोड येथे येण्याचे आवाहन केले आहे.

          डॉक्टर राजेंद्र विखे पाटील हे कुलपती प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ लोणी व्यवस्थापन परिषद सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे येथे कार्यविणीत आहेत त्यांच्या उमेदवारीने चला बदलाची सुरुवात करूया या अशा घोषवाक्याने परिसरात नाशिक शिक्षक मतदार संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

No comments