web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाड मधील शिरवली धरणात ३५ वर्षांच्या युवक झाला बेपत्ता..!

मुरबाड  : मुरबाड शहरालगत असणाऱ्या शिरवली येथील धरणात पोहण्या साठी गेलेला एक ३५ वर्षांचा युवक बेपत्ता झाल्याची घटना घडली असून प्रशासकिय यंत्रणा, पोलीस प्रशासन त्या जागेवर दाखल झाले असून मुरबाड अग्निशमन दलाचे जवान त्या तरुणाचा कसोशीने शोध घेत आहेत

प्राप्त माहिती नुसार मुरबाड तालुक्यातील धानीवली येथील ३५ वर्षांच्या गणेश भोईर आपल्या मित्रांसह पोहण्या साठी आज दोन वाजण्याच्या सुमारास शिरवली येथील धरणावर गेले होते. पोहताना गणेश भोईर हा धरणाच्या पाण्यात बुडाल्याची माहिती त्याच्या सोबत गेलेल्या मित्रांनी मुरबाड पोलीस ठाण्यात दिली. त्या नुसार पोलीस प्रशासन, महसूल यंत्रणा घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पाण्यात शोध मोहीमे साठी मुरबाड नगर पंचायत व MIDC चे अग्नीशमन दलाच्या जवानांनी गणेश भोईर याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला माञ अंधार पडल्याने हि मोहीम थांबवण्यात आली असून उद्या पुन्हा शोधमोहीम घेतली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

No comments