web-banner-lshep2024

Breaking News

मुरबाडच्या रेनबो सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूलचा शंभर टक्के निकाल संस्थापक पंढरीनाथ टोले यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन...!

गौरव शेलार / मुरबाड : नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला त्यामध्ये मुरबाड देवगाव येथील रेनबो सनराइज् इंग्लिश मीडियम Rainbow Sunrise English MediumSchool स्कूलचा 100% निकाल लागला आहे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामध्ये प्रथमेश मुंडे याचा प्रथम क्रमांक आला त्याला 87.40% तर दुसरा क्रमांक हितेश नामदेव शेलार याला 84.40%, तिसरा क्रमांक तन्मय गुप्ता याला 81.40% यांनी प्राविण्य मिळवल्याने त्यांचा सत्कार शालेय संस्थापक अध्यक्ष पंढरीनाथ टोले यांनी केला आहे.

      मुरबाड शहरातील उत्तम शिक्षकाची फौज असलेली इंग्रजी शाळा म्हणून रेनबो सनराइज् मीडियम स्कूल आहे तेथील शिक्षक गौतम यादव सर, अमोल कथोरे सर, प्राध्यापक अध्यक्ष पंढरीनाथ बुधाजी टोले यांनी स्वतः मुलांना शिक्षणाचा पाया रचून दिला विद्यार्थी घडवण्यासाठी टोले यांनी स्वतः शाळेत क्लासेस वाढीव तासिका क्लास सुरू केले होते सर्व शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना गुणवंत बनवण्यासाठी भर दिला होता. रेनबो सनराइज् इंग्रजी शाळेत ग्रामीण भागातील विद्यार्थी उत्तम शिक्षण घेण्यासाठी योग्य सोयी सुविधा निर्माण करून शिक्षणाचा दर्जा सुधारला आहे पहिलीपासून दहावीपर्यंत खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण अल्प दरात मिळावं यासाठी त्यांनी सामाजिक सेवेतून शिक्षण क्षेत्रात योगदान दिल्याने शंभर टक्के शाळेच्या निकालात भर पडल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी दिल्या आहेत.

         सर्व शिक्षक कर्मचारी वर्ग शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासह क्रीडा संस्कार कलाक्षेत्रात शिक्षण देत असल्याने रेनबो सनराइज् इंग्लिश शाळेतील विद्यार्थी उच्च दर्जाचे अधिकारी बनवण्याचा स्वप्न शाळेचे अध्यक्ष संस्थापक पंढरीनाथ टोले यांनी व्यक्त केल आहे. मुरबाड शहर आणि तालुक्यात असणाऱ्या इंग्लिश शाळा पैकी रेनबो सनराइज् इंग्लिश शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष शालेय साहित्य फीस मध्ये मदतीचा हात देत आहेत.

No comments