web-banner-lshep2024

Breaking News

निवडणुकीचे शेवटचे पाच दिवस आणि बदलते हवामान अंदाज


नामदेव शेलार / मुरबाड : लोकसभा निवडणुकीची धामधूम पाच वर्ष निवडीसाठी पाच महिने चालली आणि शेवटचे पाच दिवस उरले आहेत हवामान अंदाज बदलत चालला आहे जसा उमेदवाराचा पोल बदलत जात आहे पहिली हवा नंतर बत्ती गुल त्यानंतर पाऊस मग शेवटी उघाड असाच राजकीय ऋतुचा खेळ सुरू आहे पहिले हवा केली नंतर आरो प्रत्यारोप शेवटी अंदाज घेण्यावर राजकीय घडामोडी सुरू आहेत जसा महाराष्ट्रात ज्या ठिकाणी घडलं तसेच आता भिवंडी कल्याण ठाणे मुंबई मतदार संघात घडत आहे पण सर्वात अटीतटीच्या प्रतिष्ठा नेत्यांची लागलेली मतदार संघ कल्याण आणि भिवंडी समजले जातात येथे पक्षीय नेत्यांवर विश्वास आहे किंवा नाही याचा अंदाज राजकीय पक्षांना आलेला नाही.

       गेल्या निवडणुकीत दोन वेळा लोकांनी ज्या उमेदवारांना अनुभवले त्यांच्या प्रत्येक पाच वर्षात पुन्हा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी किती वेळा गाजराची टोपली घेऊन आले कोणती कामे केली त्याची उपलब्धता नसल्याने नव्या चेहऱ्यांना नव्या पर्यायाला 50% मान्यता अंदाज दर्श जाणवत आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी मुरबाडचे आमदार किसन कथोरे ,बदलापूरचे वामन म्हात्रे, कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर, अंबरनाथचे आमदार बालाजी किनीकर आणि कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ येथील कार्यकर्ते जोमाने काम करतात त्यांचा अंदाज निर्णायक झाल्याने येथील हवेत बदल झाला आहे.

         मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघात विरोध आहे कुठे ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ अशी मतदारांची कार्यकर्त्यांची चर्चा कपा कपा शान मारत असताना आप्पाचा आवाज विकासाच्या वादळांनी प्रत्येकाच्या कानावर नेला आहे. प्रत्येक प्रवाहात प्रत्येक घटक वाहत असतो तसा अवकाळी आणि पावसाळी पावसात पहिले वादळात कचरा आला त्यावर विजेचा कडकडाट झाला दादा मामांनी धावपळ केली अनेकांच्या घराची पत्रे उडाली पावसात कचरा भिजला मातीला वास सुटला शेतकरी कुणबी बाराबुलोतेदर जागा झाला ज्याची छप्पर उडाली त्यांना आप्पांनी झाकण दिलं एका बाजूला फाटलेल्या कपड्याला शिलाईने धागा दिला फाटलेला आकाशाला छप्पर लावू शकत नाही कोणी मात्र प्रत्येक जण अवकाळी पावसात भिजला अशा वादळाच्या वाऱ्यात आप्पा गर्जला नाक्या नाक्यावर आतिश बाजी झाली.

          शेवटचा क्षण आणि शेवटची संधी शोधत आप्पाची स्वारी आली अभी नही तो कभी नही हवेचा वादळ थंडावला त्याचं कारण तितकंच महत्त्वाचं होतं शेवटचे पाच दिवस उरले येत्या निवडणुकीत भिवंडी लोकसभेत असंच घडलं उमेदवारांनी ज्या कार्यकर्त्यांवर नियोजनाची जबाबदारी दिली होती त्यांनी त्यांची पूर्तता केली नसेल त्याचा मोठा फटका बसल्याशिवाय राहणार नाही मीडिया सोशल मीडिया परिवर्तनाची नांदी आहेत त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा फटका बसणार त्यामध्ये मतदानाची कमी होणारी टक्केवारी धोक्याची ठरणार एवढं खरं....!

No comments