निवडणुकीने मजुरी वाढवली पावसाळा पूर्वनियोजित कामाला मजूर मिळेना
नामदेव शेलार/ मुरबाड : लोकसभा निवडणुकीत सतरंज्या उचलण्यापासून झेंडे पकडून घोषणा देण्यासाठी नाक्यावरील 300 ते 400 रुपयाने मजुरी करणाऱ्या मजुरांना एक हजार रुपये देऊन रोजगाराची संधी मिळाली आहे पावसाळापूर्व नियोजित कामे करण्यासाठी सकाळी नाक्यावर दरवर्षी मजुरांची झुंबड असते परंतु यंदाच्या वर्षी नाक्यावरील सर्व मजूर लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी 1000 मजुरी देऊन सतरंज्या उचलणे झेंडे धरून रॅलीत घोषणा देणे सभा मेळावा यासाठी दररोज बुकिंग केल्याने पावसाळापूर्वी जलद गतीने कामे करणाऱ्यांच्या कामांना ब्रेक मिळाला आहे.
लोकप्रतिनिधी कार्यकर्ते पदाधिकारी उमेदवार काहीही करो आमच्या कौटुंबिक जीवनाला दोन पैसे वाढीव मिळाले पाहिजे यासाठी भटकंती करणाऱ्या मजुरांनी मात्र आपला मताचा हक्क मनाप्रमाणे बजावण्याचा निर्णय घेतला आहे कोणी काहीच करत नाहीत एरवी मौल मजुरांकडे पाहत नसणारे खासदार मंत्री आमदार उमेदवार नेते कार्यकर्ते निवडणुकीत हात जोडतात पाया पडतात हातावर कामे केलेली मजुरी भरघोस देतात हाच पाच वर्षाचा आनंद कामगारांच्या चेहऱ्यावर तेजावत आहे.
लग्नसराई जोरात सुरू आहे लग्न समारंभात जेवण वाढण्यासाठी जेवण बनवण्यासाठी पापड बनवण्यासाठी नियमित रोजगारबद्ध असलेल्या पुरुष महिलांना निवडणुकीत हाताला काम आणि जादा पैसे मिळाल्याने अनेकांना मजुराची कमतरता जाणवली सकाळी यांच्या रॅलीत दुपारी त्यांच्या सभेत संध्याकाळी तिसऱ्याच्या मेळाव्यात गर्दीचा उच्चांक मोडणाऱ्या लोकसंख्येत मतदार कमी मात्र कार्यकर्ते आणि हातावर पोट भरणारे मजुरांचा जास्त समावेश आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात बहुसंख्य उत्तर भारतीय पर जिल्ह्यातील मजुरांचा राजकीय मेळावे सभा रॅलीत सहभाग दिसून आला जेवढी गर्दी एकमेकांसमोर शक्ती प्रदर्शने करत होते त्यामध्ये सामान्य मजुरांची संख्या जास्त होती मात्र स्थानिक पातळीवरील बांधकामापासून किरकोळ कामांना मजुरांची कमतरता जाणवत आहे.



No comments